मुंबई 11 जुलै**:** बिग बॉस (Bigg Boss) हा वादग्रस्त परंतु तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो म्हणून ओळखला जातो. या शोचा 15 वा सीझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बिग बॉसनं मिळवलेल्या लोकप्रियतेत अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) सिंहाचा वाटा आहे. त्याच्या अनोख्या होस्टिंग स्टाईलमुळेच बिग बॉसने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं असं म्हणतात. परंतु यावेळी मात्र सलमान खान या शोमध्ये होस्टिंग करताना दिसणार नाही. त्याऐवजी मेकर्सने एका वेगळ्याच अभिनेत्याची निवड केली आहे. लव्हस्टरी फेम कुमार गौरव का झाले बॉलिवूडमधून गायब? 21 वर्ष काय करतायेत प्रत्येक सीझनगणिक बिग बॉसमध्ये काही बदल झालेले दिसतात. दरवेळी मेकर्स प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं करतात. यावेळी त्यांनी बिग बॉसला टीव्हीच्याही आधी OTT वर ब्रॉडकास्ट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही प्रेक्षक नाराजही झाले परंतु त्यांना खरा धक्का मेकर्सनं आत्ता दिला आहे. द खबरीने दिलेल्या वृत्तानुसार निर्मात्यांनी सलमान ऐवजी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची (Sidharth Shukla) होस्ट म्हणून निवड केली आहे. सिद्धार्थ हा बिग बॉस 13 चा विजेता होता. शिवाय 14 व्या सीझनमध्ये देखील तो झळकला होता. सध्या तो लोकप्रियतेच्या खिखरावर आहे. त्याच्या वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडीओंना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात होस्ट म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. ‘मी अभिनेता आहे पॉर्नस्टार नाही’; किसिंग सीनमुळे पारसचा वेब सीरिजला नकार अर्थात सलमान किंवा सिद्धार्थ शुक्ला यांनी याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जाहिर केलेली नाही. परंतु गेल्या काही काळात निर्मात्यांसोबत सलमानचे मतभेद सुरु आहेत. दरवर्षी एपिसोडगणिक तो मानधनात कोट्यवधींची वाढ करतोय. त्यामुळे सलमानला रिप्लेस करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला अशी चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







