• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सलमान खान नाही अटेंड करणार कतरिना-विकिचं लग्न? काय आहे सत्य

सलमान खान नाही अटेंड करणार कतरिना-विकिचं लग्न? काय आहे सत्य

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचे (Katrina Kaif) चाहते डिसेंबरमध्ये होणाऱ्या त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. राजस्थानमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. जिथे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटी या रॉयल सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

 • Share this:
  मुंबई, 16 नोव्हेंबर-  विकी कौशल  (Vicky Kaushal)  आणि कतरिना कैफचे  (Katrina Kaif)  चाहते डिसेंबरमध्ये होणाऱ्या त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. राजस्थानमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. जिथे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटी या रॉयल सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आता बातम्या येत आहेत की कतरिना कैफचा जवळचा मित्र सलमान खान (Salman Khan) या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान त्याच्या आगामी 'टायगर 3' आणि 'पठाण' या चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग शूट करणार होता. परंतु शाहरुख खानच्या वैयक्तिक आयुष्यातील संकटामुळे त्यासाठी विलंब झाला आहे. आता सर्व काही ठीक आहे, त्यामुळे सलमान डिसेंबरमध्ये 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग करण्याची योजना आखत आहे. जेणेकरून तो शाहरुख खानसोबत उर्वरित शूट पूर्ण करू शकेल. अॅटलीसोबतच्या दुसऱ्या चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी शाहरुख खान देश सोडण्यापूर्वी, सलमानसाठी हे शूट करणे महत्त्वाचे आहे. शूटिंगच्या तारखा कतरिनाच्या लग्नाच्या तारखांशी क्लॅश होऊ शकतात. त्यामुळे सलमानला या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा बेत करावा लागणार असल्याचं म्हणावं लागत आहे. चित्रपट निर्माते कबीर खान यांच्या उपस्थितीमुळे सलमान कतरिनाच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचीही चर्चा आहे. 'ट्यूबलाईट'च्या अपयशानंतर अभिनेता-दिग्दर्शकामध्ये तेढ निर्माण झाल्याचं ऐकण्यात आलं होतं. ते एकमेकांशी बोलत नाहीत. दिवाळीला दिग्दर्शकाच्या मुंबईतील घरी झालेल्या या अभिनेत्रीच्या रोका सोहळ्यालाही सलमानने हजेरी लावली नाही. अशीही बातमी होती. त्यांची लव्हस्टोरी दीर्घकाळ गुप्त ठेवल्यानंतर, विकी आणि कतरिना या डिसेंबरमध्ये राजस्थानमधील फोर्ट रिसॉर्टमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. लव्ह बर्ड्सनी त्यांच्या बिझी वेळापत्रकामुळे आणि साथीच्या आजारामुळे लग्नासाठी आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन निवडले नाही. लग्नानंतरही ते कोणताही मोठा ब्रेक घेणार नाहीत, कारण दोघेही पुढे काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: