मुंबई, 11 सप्टेंबर : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा दबंग 3च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं जवळपास सर्व शूटिंग पूर्ण होत आलं आहे. काही भागाचं शूटिंग अद्याप बाकी आहे. त्यामुळे हा कधी रिलीज होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा अंदाज लावला जात होता. मात्र आता या सर्व चर्चा थांबल्या आहेत. सलमानच्या बहुचर्चित दबंग 3 चं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून यासोबतच या सिनेमाच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली. सलमाननं स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. भाईजाननं त्याच्या ट्वीटर अकाउंटवर ‘दबंग 3’चं मोशन पोस्टर शेअर केलं. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 100 दिवसांनंतर येतोय, चुलबुल रॉबिनहुड पांडे, बरोबर 100 दिवसांत स्वागत तर करा माझं. #100DaysToDabangg3. या मोशन पोस्टमध्ये सलमान त्याच्या खास दबंग स्टाइलमध्ये चालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान, ‘स्वागत नहीं करोगे हमारा.’ असं बोलताना दिसत आहे. KBC 11 : ‘बिहार का लाला’ ठरला पहिला करोडपती, 1 कोटी जिंकून रचला इतिहास
‘दबंग 3’ या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं असून सिनेमात सलमान खान सोबत सोनाक्षी सिन्हा आणि मराठी अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर स्क्रिन शेअर करणार आहे. सोनाक्षीचा लुक रिलीज झाला असला तरीही सईचा लुक मात्र अद्याप समोर आलेला नाही. ती या सिनेमात सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची भूमिका साकरत आहे. बापरे! प्रियांका चोप्राचा होता बँक लुटीचा प्लान, पोलिसांनी पकडलं ‘रंगेहाथ’ ‘दबंग 3’ या वर्षाच्या शेवटी म्हणजे 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. ख्रिसमस वीकमध्ये हा सिनेमा रिलीज होत असल्यानं बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा बोलबाला होणार असा अंदाज लावला जात आहे. याशिवाय या महिन्यात इतरही ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज होत आहेत. अर्जुन कपूरचा ‘पानिपत’ 6 डिसेंबर, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ 13 डिसेंबर आणि अक्षय कुमार आणि करीना कपूर यांचा ‘गुडन्यूज’ 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे. कॉलेजमध्ये ड्रग्ज देऊन केलं माझं लैंगिक शोषण, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ =============================================================== VIDEO : ‘राणादा’च्या घरचा गणपती, केलं ईको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन