कॉलेजमध्ये ड्रग्ज देऊन केलं माझं लैंगिक शोषण, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

कॉलेजमध्ये ड्रग्ज देऊन केलं माझं लैंगिक शोषण, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

ही अभिनेत्री कॉलेजमध्ये असताना तिला अत्यंत वाईट अनुभव आला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा केला.

  • Share this:

न्यूयॉर्क, 10 सप्टेंबर : जगभरात उठलेल्या Me Too वादळानं सर्वांनाच ढवळून काढलं. एकामागोमाग एक अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारांबाबत उघडपणे बोलायला सुरुवात केली. नुकताच एका हॉलिवूड अभिनेत्रीनं सुद्धा तिच्यासोबत घडलेला अशाच एका प्रकारचा अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री कॉलेजमध्ये असताना तिला अत्यंत वाईट अनुभव आला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा केला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर टफ्लिक्स सीरीज Riverdale मध्ये कॅमिला मेंडेस(Camila Mendes) आहे.

हॉलिवूड अभिनेत्री कॅमिला मेंडेसनं एका वुमन हेल्थ मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत स्वतःवर झालेल्या अत्याचारांबाबत बोलतानाच इतर अनेक खुलासेही केले. कॅमिला सांगते, मी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये Tisch School of the Arts चं शिक्षण घेत होते. त्यावेळी कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत माझं शारिरिक शोषण करण्यात आलं होतं.

कॉलेजच्या पहिल्या वर्षातच आला होता वाईट अनुभव

स्पॉटबॉय-ईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कॅमिलानं कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा अनुभाव शेअर केला. ती सांगते, 'कॉलेजचं पहिलं वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण गेलं. मला त्या वर्षात बरेच वाईट अनुभव आले. एका व्यक्तीनं ड्रग्स देऊन माझं शारीरिक शोषण केलं होतं.' मात्र त्या व्यक्तीचं नाव घेणं मात्र कॅमिलानं टाळलं. ती पुढे म्हणाली, त्यावेळी मी ठरवलं की माझं आयुष्य सुरक्षित आणि सुसह्य करण्यासाठी मला होतील तेवढे प्रयत्न मी करणार. या घटनेनंतर कॅमिलानं स्वतःच्या पाठीवर 'to build a home' असा टॅटूच बनवून घेतला.

संजय दत्त आता या मुलीच्या प्रेमात, I Love You म्हणतानाचा व्हिडीओ आला समोर

आदर्श व्यक्ती बनयचंय

कॅमिला सांगते, 'हा टॅटू मला आठवण करुन देतो की, स्वतःसोबतच मला माझ्या आसपासच्या लोकांनाही आणि विशेषतः मुलींना खंबीर बनवायचं आहे. मी माझ्या चाहत्यांसाठी आदर्श व्यक्ती होऊ इच्छिते. मला खाण्याच्या सवयींमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरुकता पसरवायची आहे. कारण हे कॉलेजच्या वयात खूप गरजेच असतं असं मला वाटतं'

पहिल्याच प्रश्नासाठी लाइफलाइन वापरणारा 19 वर्षांचा हिमांशू पोहोचला 1 कोटीवर

कॅमिला पुढे म्हणाली, मी एक अशी टीनएजर होते जिच्याकडे बॉडी आणि सकारात्मकतेसाठी कोणीही रोल मॉडेल नव्हतं. त्यावेळी या अशाप्रकारच्या घटनांवर कोणीही उघडपणे बोलत नसे. तसेच त्यावेळी स्लिम असणं हे सुंदरतेच लक्षण मानलं जात असे. तुम्ही कसे दिसता यापेक्षी चांगली हेल्थ असणं खूप गरजेचं आहे. आपण अशा गोष्टी कराव्या ज्या आपल्यासाठी योग्य आहेत. आपल्या शरीरासाठी योग्य आहेत. तसेच आपला आत्मा आणि मेंदूसाठी योग्य आहेत.

दोन घटस्फोट, वादग्रस्त आयुष्य; आता 'हा' स्टार 25 वर्षांच्या तरुणीशी रिलेशनमध्ये

==========================================================

VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक

Published by: Megha Jethe
First published: September 10, 2019, 5:19 PM IST

ताज्या बातम्या