बापरे! प्रियांका चोप्राचा होता बँक लुटीचा प्लान, महाराष्ट्र पोलिसांनी पकडलं 'रंगेहाथ'

बापरे! प्रियांका चोप्राचा होता बँक लुटीचा प्लान, महाराष्ट्र पोलिसांनी पकडलं 'रंगेहाथ'

The Sky Is Pink ट्रेलर रिलीजनंतर काही तासांतच महाराष्ट्र पोलिसांनी प्रियांका चोप्राला नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे ती तिचा आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक'मुळे. या सिनेमातून प्रियांका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमाची सुरुवातीपासूनच चर्चा झाली. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमासाठी प्रियांकानं सलमान खानचा 'भारत' सिनेमा नाकारल्याचं सर्वांनाच माहीत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालं. त्यानंतर आता नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सुद्धा रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र या ट्रेलर रिलीजनंतर महाराष्ट्र पोलिसांनी प्रियांका चोप्राला नोटीस पाठवली आहे.

'द स्काय इज पिंक'च्या ट्रेलर रिलीज नंतर महाराष्ट्र पोलिसांनी प्रियांकाला नोटीस पाठवली. घाबरु नका ही नोटीस प्रियांकाच्या कोणत्याही अपराधासाठी नाही तर तिच्या सिनेमातील एका डायलॉगसाठी आहे. 'द स्काय इज पिंक'च्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा फरहान अख्तरला सांगताना दिसते, ‘एकदा आयशाला ठीक होऊदेत मग दोघं मिळून बँक लुटूयात’ प्रियांकाच्या या सीनचा स्क्रीनशॉट शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, या गुन्ह्यासाठी तुम्हला आयपीसी कलम 393 नुसार दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

ऐश्वर्या रायच्या डोहाळे जेवणाचे फोटो झाले VIRAL, 8 वर्षांपूर्वी असं दिसायचं कपल

प्रियांका चोप्रानं महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्वीटला उत्तर देत एक ट्वीट केलं. तिनं लिहिलं, ‘उप्स, रंगे हात पकडले गेलो. आता प्लान B अ‍ॅक्टीव्हेट करावा लागेल.’ यानंतर प्रियांकाच्या चाहत्यांनी त्यावर अक मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, पीसी एकदम गप्प राहा, त्यांनी आपण सांगायचंच नाही की आणखी कोणता प्लान सुद्धा आहे.

'द स्काय अज पिंक'चा ट्रेलर प्रेक्षाकांच्या पसंतीत उतरत आहे. ट्रेलरची सुरुवात होते ती फरहान आणि प्रियांकाच्या रोमँटिक सीननं नंतर त्यांच्या लाइफची काहाणी बदलत जाते. हे दोघंही लग्न करतात त्यांना एक मुलगी होती. जी एका गंभीर आजारानं ग्रस्त असते. तिला वाचवण्यासाठी दोघंही खूप प्रयत्न करत असतात. अशात त्या मुलीच्या उपचार करण्याच्या वेळी प्रियांका बँक लूटण्याचा डायलॉग मारते. अभिनेत्री जायरा वसीम या आजारी मुलीची भूमिका साकारत आहे.

संजय दत्त आता या मुलीच्या प्रेमात, I Love You म्हणतानाचा व्हिडीओ आला समोर

आपल्या मुलीला तिच्या आजाराविषयी सांगणं. त्यानंतर तिच्या उपचारांसाठी केलेला संघर्ष. दरम्यान नवरा-बायकोच्या नात्यात आलेला दुरावा आणि वाद या सगळ्याचं मिश्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. आपल्या मुलीशिवाय दुसरं कोणतंच विश्व नसलेली पण तेवढीच खंबीर आई प्रियांका चोप्रानं साकारली आहे. सत्य स्विकारत हार न मानता संघर्ष करणं म्हणजे द स्काय इज पिंकचा ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं.

‘द स्काय इज पिंक’ या सिनेमातून जवळपास 3 वर्षांनी प्रियांका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमाच्या रॅपअप पार्टीमध्ये बोलताना प्रियांका म्हणाली होती, ‘मला अनेकांनी मी ‘भारत’ सोडून ‘द स्काय इज पिंक’ का निवडला असा प्रश्न विचारला. पण मला ‘भारत’ सारख्या ‘डान्स-साँग सिनेमा’ पेक्षा ‘द स्काय इज पिंक’ची कथा जास्त आवडली. मी या सिनेमात 18 वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. पण हा सिनेमा मी फक्त दिग्दर्शक सोनाली बोससाठी केला. कारण या सिनेमाची कथा खूप वेगळी आहे आणि मला ती खूप आवडली त्यामुळे मी हा सिनेमा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी निवडला.’

पहिल्याच प्रश्नासाठी लाइफलाइन वापरणारा 19 वर्षांचा हिमांशू पोहोचला 1 कोटीवर

प्रियांकाचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरीच्या पालकांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा यांच्यासह, झायरा वसीम आणि रोहित सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची निर्मीती रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे.

===================================================================

मराठी सेलिब्रिटींनी केला बदलाचा श्रीगणेशा, पाहा हा VIDEO

First published: September 11, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading