जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अनिल कपूरच्या कपड्यांवर जळायचा सलमान खान? बिल पाहून बसला होता शॉक म्हणाला, माझ्या करिअर...

अनिल कपूरच्या कपड्यांवर जळायचा सलमान खान? बिल पाहून बसला होता शॉक म्हणाला, माझ्या करिअर...

सलमान खान आणि अनिल कपूर

सलमान खान आणि अनिल कपूर

द नाइट मॅनेजर या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर द कपिल शर्माच्या मंचावर पोहोचला होता. याचवेळी त्यांनी सलमान खानबरोबरचा एक किस्सा शेअर केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉस ओटीटी सीझन 2मुळे चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक बिग बॉस ओटीटी पाहत असतात. सलमान खान यावेळी देखील बिग बॉसचं दमदार होस्टिंग करताना दिसतोय. दरम्यान सलमान खानचा जवळचा मित्र अनिल कपूर नुकताच द कपिल शर्मा शो मध्ये पोहोचला होता. इथे येऊन अनिल कपूरनं सलमान खानबद्दल काही अशा गोष्टींचा खुलासा केला ज्या आजवर कोणाला माहिती नव्हत्या. द नाइट मॅनेजर या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, शोभिता धूलिपालासह संपूर्ण टीम द कपिल शर्माच्या मंचावर पोहोचली होती. नुकताच शोचा प्रोमो रिलीज झालाय. ज्यात अनिल कपूर सलमान खानच्या फॅशन सेन्सवर बोलताना दिसत आहेत. सलमान खानची पोलखोल करत असताना अनिल कपूर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बातचित केली. हेही वाचा -  मनोज कुमारला भर रस्त्यात पडला होता एका मुलीचा ओरडा; त्यानंतर अभिनेत्याने उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल शोमध्ये कपिल शर्माने अनिल कपूरच्या सरटोरियल चॉइसची चांगलीच तारीफ केली. “तुमचे सूट आणि नाइट सूट पाहून तुमच्या आऊटफिटमध्ये इंटरनॅशन वाइब येते”, असं कपिल म्हणाला. त्यावर अनिल कपूरने, “मी तर नाइट सूटमध्ये नव्हतो” असं हसत उत्तर दिलं. त्यानंतर कपिल शर्मानं अनिल कपूरला प्रश्न केला की, “वेब सीरिजमध्ये तुम्ही जे कपडे घालते होते ती स्क्रिप्टची डिमांड होती की तुमची?” याच उत्तर दे अनिल कपूर म्हणाले, “त्या कपड्यांची डिमांड माझी होती”. यावर कपिल शर्मानं अनिल कपूरचं कौतुक केलं. मग अनिल कपूरनं देखील कपड्यांची रिलेटेड एक जुना किस्सा सर्वांना ऐकवला.

News18लोकमत
News18लोकमत

अनिल कपूर म्हणाले, “मी सलमान खानबरोबर एक सिनेमा केला होता. जेव्हा कपड्यांचं बिल आलं तेव्हा त्यात माझ्या कपड्यांची फार मोठी अमाउंट होती. कपड्यांचे पैसे पाहून सलमान खान देखील शॉक झाला. माझ्या संपूर्ण करिअरमधल्या सिनेमांचं एकत्र करूनही इतकं बिल आलं नाही”, असं सलमान खान अनिल कपूरला म्हणाला होता. सलमान खानच्या या वक्तव्यावर अनिल कपूर म्हणाला की, “तू तर हँडसम आहेत. फक्त जिन्स, टी-शर्ट घालून चांगला दिसतोस. मलाही हँडसम दिसायचं आहे”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात