मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Happy Birthday Salman Khan : भाईजानच्या वाढदिवशी मध्यरात्रीच पोहचला किंग खान; हातात हात घेत अशा दिल्या शुभेच्छा

Happy Birthday Salman Khan : भाईजानच्या वाढदिवशी मध्यरात्रीच पोहचला किंग खान; हातात हात घेत अशा दिल्या शुभेच्छा

सलमान खान-शाहरुख खान

सलमान खान-शाहरुख खान

'भाईजान'ने आज त्याच्या वाढदिवसाची सुरुवात एका ग्रँड पार्टीने केली ज्यामध्ये इंडस्ट्रीतील टॉप स्टार्स त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. पण या सर्व स्टार्समध्ये एका व्यक्तीने खास लक्ष वेधले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 27 डिसेंबर :  बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज 27 डिसेंबर 2022 रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानचा इंडस्ट्रीत एक वेगळाच दरारा आहे, म्हणूनच त्याला बॉलिवूडचा 'गॉडफादर' देखील म्हटले जाते. 'भाईजान'ने आज त्याच्या वाढदिवसाची सुरुवात एका ग्रँड पार्टीने केली ज्यामध्ये इंडस्ट्रीतील टॉप स्टार्स त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. पण या सर्व स्टार्समध्ये एका व्यक्तीने खास लक्ष वेधले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आहे. सलमानचा जवळचा मित्र सुपरस्टार शाहरुख खान सलमानला वाढदिवशी शुभेच्छा द्यायला मध्यरात्रीच पोहचला. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

बॉलीवूडचा 'अर्जुन' अर्थात शाहरूख खान 'करण अर्जुन' चित्रपटाच्या 'करण'ला म्हणजेच सलमान खानला त्याच्या 57 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला. सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत पोहोचणारा शाहरुख शेवटचा स्टार होता. ब्लॅक लेदर जॅकेट परिधान करून अभिनेता सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला अतिशय मस्त स्टाईलमध्ये उपस्थित होता.

हेही वाचा - Happy Birthday Salman Khan : एका वेळेस खायचा 30-35 चपात्या, भाईजाचं एकेकाळचं डाएट वाचून तुम्हीही म्हणाल, बापरे!

शाहरुख खानच्या एंट्रीचा जास्त गाजावाजा होत आहे. खरं तर, सलमानला भेटल्यानंतर, जेव्हा शाहरुख त्याच्या बर्थडे पार्टीमधून निघू लागला तेव्हा 'बर्थडे बॉय' सलमान स्वत: त्याला कारपर्यंत बाहेर सोडण्यासाठी आला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरुख आणि सलमान बाहेर काहीतरी बोलत आहेत आणि नंतर कारमध्ये बसण्यापूर्वी शाहरुख सलमानला मिठी मारतो. असे केल्यावर सलमाननेही शाहरुखला घट्ट मिठी मारली. यानंतर शाहरुख आणि सलमानने मीडियासमोर हात धरून पोज दिली आणि त्यानंतर शाहरुखला तेथून हटवण्यात आले.

शाहरुख खान पार्टीला उशिरा पोहचला पण सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला. 'किंग खान' येताच पापाराझींमध्ये खळबळ उडाली. सोशल मीडियावर लोक शाहरुखच्या एंट्रीचा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा पाहत आहेत, पण जो व्हिडिओ खळबळ माजवला आहे तो शाहरुख खानच्या एक्झिटचा आहे, ज्यामध्ये सलमान खान स्वतः अभिनेत्याला सोडायला आला आहे. सलमान-शाहरुखचा हा व्हिडिओ चाहत्यांना 'करण अर्जुन'ची आठवण करून देतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शाहरुख-सलमानचे चाहते भावूक झाले आहेत आणि त्यांना त्यांच्या 'करण अर्जुन' चित्रपटाची आठवण झाली ज्यामध्ये त्यांनी भावांची भूमिका केली होती.

आता पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर सलमान आणि शाहरुख मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. शाहरुखच्या बहुचर्चित पठाण चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या दोघांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांच्या घरी 27 डिसेंबर 1965 रोजी सलमान खानचा जन्म झाला. सलमान खानने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटाद्वारे अभिनय जगतात पाऊल ठेवले. यामध्ये त्याने सहाय्यक भूमिका केली होती. या चित्रपटातून आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सलमानची उंची काय आहे, हे सर्वांसमोर आहे. सलमानला बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर मानला जातो.

First published:

Tags: Bollywood actor, Salaman- shahrukh meets, Salman khan, Shahrukh khan