Home /News /entertainment /

करोडोंची मालकीण असलेली दीपिका फक्त सिनेमाच नाही तर या गोष्टींमधूनही कमावते पैसा

करोडोंची मालकीण असलेली दीपिका फक्त सिनेमाच नाही तर या गोष्टींमधूनही कमावते पैसा

नुकतीच फोर्ब्स या मासिकानं सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव प्रसिद्ध केली. दीपिकाचं नाव या यादीत 10 व्या स्थानावर आहे.

  मुंबई, 05 जानेवारी : दीपिका पदुकोण सध्या ‘छपाक’मुळे खूप चर्चेत आहे. त्यातच रविवार 5 जानेवारीला तिचा वाढदिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून ती छपाकच्या प्रमोशनमध्ये बीझी होती. त्यादरम्यान फोर्ब्स या मासिकानं सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे दीपिकाचं नाव या यादीत 10 व्या स्थानावर आहे. दीपिकाची या वर्षांची कमाई 48 कोटी रुपये एवढी आहे. मात्र तिची ही कमाई फक्त सिनेमातून केलेली नाही. तर या व्यतिरिक्त इतर अनेक उत्पन्नाची साधनं तिच्याकडे आहेत. दीपिका फक्त सिनेमात अभिनय करुनच नाही तर बिझनेस मधूनही पैसे कमावते. दीपिकानं वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकानं इलेक्ट्रीक टॅक्सी स्टार्टअप ‘ब्लू स्मार्ट’मध्ये तीन मिलियन डॉलरची गुंतवणूक केली म्हणजे या बिझनेसमध्ये भारतीय चलनानुसार तिनं जवळपास 12 कोटी रुपये गुंतवले आहेत. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायका अरोरा दिसते HOT आणि FIT, काय आहे गुपित
   
  View this post on Instagram
   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

  या अगोदर दीपिकानं ड्रम्स फूड आणि एका स्पेस टेक्नोलॉजी स्टार्टअप ‘एरोस्पेस’मध्येही पैशांची गुंतवणूक केली होती. याशिवाय ती अनेक ब्रॅन्ड्सच्या जाहीराती, फोटोशूट आणि सोशल मीडिया शेअरिंगच्या माध्यमातून पैसे कमावते. दीपिका मिंत्रा, तनिष्क, टेटले ग्रीन टी आणि लॉरिअल सारख्या ब्रॅन्डच्या जाहीरातींमध्ये दिसते. दीपिकानं नोव्हेंबर 2018 मध्ये रणवीर सिंहशी लग्न केलं. त्यानंतर तिनं कोणताही सिनेमा केला नाही. लग्नानंतर जवळपास 1 वर्षानंतर ‘छपाक’ हा तिचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षभरात एकही सिनेमा न केल्यानं दीपिकाची कमाईमध्ये घट झाली आहे. मागच्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स यादीत दीपिका 4 थ्या स्थानावर होती. पण आता आलिया भट बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे.
  ‘छपाक’नंतर दीपिका रणवीर सिंहसोबत ‘83’मध्ये दिसणार आहे. या सिनेमात रणवीर कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारत आहे तर दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारतेय. फोर्ब्स यादीत रणवीर सिंह 7 व्या स्थानावर आहे. त्यांची वर्षभराची कमाई 118 कोटी रुपये आहे.
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Deepika

  पुढील बातम्या