मुंबई, 21 फेब्रुवारी- एक नकार कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही. पण शाहरूख खानच्या बाबतीत हे खरं ठरलं आहे. एका मोठ्या स्टारच्या एका नकारामुळे शाहरूखचं आयुष्यचं बदललं असंच म्हणाव लागले. शाहरूख यामुळेच सुपरस्टार झाल असं म्हटलं तरी वावग वाटायला नको. करिअरच्या सुरूवातीच्या काळात कोणताही कलाकार नकारात्मक भूमिका करण्यास तयार नसतो. मात्र शाहरूख खानने रिस्क घेत नकारात्म भूमिका करण्याचे धाडस दाखवले. बाजीगर सिनेमात नकारात्मक भूमिका साकारून शाहरूखने एक वेगळी ओळख निर्माण केली. सिनेमा हिट झाला आणि शाहरूखचं आयुष्यचं बदलून गेलं. मात्र या सिनेमासाठी शाहरूख निर्मात्यांची पहिली पसंत नव्हता. या सिनेमात एक मोठा स्टार दिसणार होत. कोण आहे हा स्टार याबद्दल जाणून घेऊयात. वाचा- ‘मी अजूनही तुला सर्वत्र शोधत आहे मम्मा’, श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झाली लेक 1993 साली शाहरू खानचा ‘बाजीगर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्यांदाच शाहरूख या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसला. त्या काळात मेन हिरो नकारात्मक भूमिका साकारण्यास सहज तयार होत नव्हते. मात्र शाहरूखने धाडस दाखवले आणि त्याची अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. आज देखील शाहरूखची ती भूमिका सर्वांच्या लक्षात आहे. शाहरूखच्या आधी या सिनेमात अक्षय, अजय आणि सलमान यांना घेण्याची चर्चा सुरू होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार निर्माते या सिनेमासाठी अक्षय, अजय आणि सलमान यांच्या नावाचा विचार करत होती. तशी बोलणी सुरू होती. मात्र भूमिका नकारात्मक असल्याने कुणीच होकार दिला नाही. सगळ्यांकडून नकार आला. सलमान खानला देखील वाटलं की करिअरच्या सुरूवातीस अशाप्रकारे नकारात्मक भूमिका करणं योग्य नाही. त्यामुळेच सलमान खानने हा सिनेमा करण्यास नकार दिला. सलमानच्या एका नकाराने शाहरूखचं आयुष्य मात्र बदलून गेलं.
कसा मिळाला शाहरूखला रोल? सिनेमाच्या निर्मात्यांची शाहरूखच्या नावाला पसंती नव्हती मात्र शाहरूख एके दिवशी अब्बास-मस्तानच्या ऑफीसमध्ये आला होता. तो दुसऱ्या एका सिनेमासाठी आला होता. त्याचवेळी त्याला बाजीगर सिनेमासाठी सांगण्यात आलं. त्याने जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा त्याने लगेच होकार कळवला.
या सिनेमासाठी मिळाला फिल्मफेअर ‘बाजीगर’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर शाहरूखचं आयुष्य बदलून गेलं. त्याला यासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. आजही त्याच्या भूमिकेचं कौतुकचं केलं जातं.