मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सलमान खानने मुंबईत घेतलं डुप्लेक्स घर, महिन्याचं भाडं ऐकून हैराणच व्हाल

सलमान खानने मुंबईत घेतलं डुप्लेक्स घर, महिन्याचं भाडं ऐकून हैराणच व्हाल

करोडो रुपयांचा मालक असलेल्या सलमानवर घर भाड्यानं घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. सलमान खानने अलीकडेच त्याच्या वांद्रेतील घराजवळ भाडे तत्त्वावर एक डुप्लेक्स फ्लॅट घेतला आहे.

करोडो रुपयांचा मालक असलेल्या सलमानवर घर भाड्यानं घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. सलमान खानने अलीकडेच त्याच्या वांद्रेतील घराजवळ भाडे तत्त्वावर एक डुप्लेक्स फ्लॅट घेतला आहे.

करोडो रुपयांचा मालक असलेल्या सलमानवर घर भाड्यानं घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. सलमान खानने अलीकडेच त्याच्या वांद्रेतील घराजवळ भाडे तत्त्वावर एक डुप्लेक्स फ्लॅट घेतला आहे.

  नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : अनेक बॉलिवुड कलाकारांची मुंबईमध्ये आलिशान घरं आहेत. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान यांच्या घरांना तर जबरदस्त प्रसिद्धी मिळालेली आहे. सलमान खानने (Salman Khan) नुकतंच एक डुप्लेक्स घर भाड्यानं घेतल्याची माहिती समोर आली आहे. करोडो रुपयांचा मालक असलेल्या सलमानवर घर भाड्यानं घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. सलमाननं कायमस्वरुपी राहण्यासाठी नाही, तर एका कामानिमित्त हा डुप्लेक्स फ्लॅट (Duplex) भाड्याने घेतला आहे.

  सलमान खान आपल्या कुटुंबासह वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये (Galaxy Apartment) राहतो. याशिवाय मुंबईत अनेक ठिकाणी त्याची मालमत्ता आहे. तरीदेखील सलमान खानने अलीकडेच त्याच्या वांद्रेतील घराजवळ भाडे तत्त्वावर एक डुप्लेक्स फ्लॅट घेतला आहे. या डुप्लेक्ससाठी त्याला महिन्याकाठी 8 लाख 25 हजार रुपये भाडं (Rent) मोजावं लागणार आहे. हा डुप्लेक्स काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी यांच्या मालकीचा आहे. सलमान खान सिद्दिकी कुटुंबामध्ये जवळचे संबंध आहेत. अनेकदा खान कुटुंबीय आणि सिद्दिकी कुटुंबीय एकमेकांच्या पार्ट्यांना हजेरी लावताना दिसतात.

  एका रिअल इस्टेट पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, 2 हजार 265 चौरस फूट कार्पेट एरिया असलेली ही मालमत्ता सलमान खानने 11 महिन्यांसाठी भाड्याने घेतली आहे. या ठिकाणी सलमान स्वत: राहणार नाही. या डुप्लेक्सचा वापर सलमान खानच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या लेखकांसाठी केला जाणार आहे. वांद्रेतील मकबा हाइट्सच्या 17 व्या आणि 18 व्या मजल्यावरील डुप्लेक्ससाठी सलमान खान व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने भाडे कराराचं नूतनीकरण केलं आहे.

  सलमान खानच्या 'Antim'ची प्रदर्शनापूर्वीच धूम ; सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये

  सध्या सलमान खानचा 'अंतिम: द फायनल ट्रूथ' हा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. महेश मांजरेकरचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याचा मेहुणा आयुष शर्मा देखील दिसणार आहे. सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत, तर आयुष गुंडाच्या भूमिकेत आहे.

  'अंतिम: द फायनल ट्रूथ' आणि जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते 2' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. याशिवाय सलमान सध्या कॅटरिना कैफसोबत टायगर 3च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

  Om Puri Birth Anniversary: चहाचे कप धुण्यापासून ते हॉलिवूडपर्यंत, रोमांचक होता ओम पुरी यांचा प्रवास

  मनीष शर्माचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होईल. सलमान खानच्या हातात 'कभी ईद कभी दिवाली' आणि 'किक 2' हे चित्रपट देखील आहेत. सोबतच शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटात देखील सलमान कॅमियो करणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Salman khan