जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खानच्या 'Antim'ची प्रदर्शनापूर्वीच धूम ; सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये लागलीय रेस

सलमान खानच्या 'Antim'ची प्रदर्शनापूर्वीच धूम ; सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये लागलीय रेस

सलमान खानच्या 'Antim'ची प्रदर्शनापूर्वीच धूम ; सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये लागलीय रेस

सलमान खानच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते. आयएमडीबीच्या अहवालानुसार ‘अंतिम’ला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई. 18 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आपल्या बहुप्रतिक्षित ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ (Antim: The Final Truth) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट याचवर्षी २६ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान आपला मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) सोबत दोन हात करताना दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून आता फक्त प्रोडक्शनचे काम बाकी आहे. सलमानने स्वत: ट्वीट करून चाहत्यांना चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते. आता ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपटही आयएमडीबी म्हणजेच मोस्ट एंटीसिपेटेड न्यू इंडियन मुव्हीज एंड शोजच्या यादीमध्ये टॉप थ्रीमध्ये आहे. आयएमडीबीच्या अहवालानुसार ‘अंतिम’ला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. आयएमडीबीच्या रियल टाईम पॉप्युलर मीटरमध्ये पहिल्यांदा सलमानचा अंतिम पहिल्या क्रमांकावर होता. परंतु, आता ती जागा अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटाने घेतली आहे. तर सलमानचा अंतिम तिसऱ्या स्थानावर गेला आहे. तर दुसऱ्या स्थानावर जय भीम हा चित्रपट कायम आहे. सलमान खानच्या ‘Antim’ची प्रदर्शनापूर्वीच धूम ; सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये लागलीय रेस(फोटो साभारः IMDB)

सलमान खानच्या ‘Antim’ची प्रदर्शनापूर्वीच धूम ; सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये लागलीय रेस(फोटो साभारः IMDB)

अंतिम चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले असून त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पोस्टरमध्ये सलमान आणि आयुष दमदार लुकमध्ये दिसत आहेत. पोस्टरवरून हे स्पष्ट होतंय की सलमान आणि आयुष चित्रपटात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. चित्रपटातील गाण्याचीही सध्या सोशल मीडियावर धूम आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शीत केला आहे. वाचा : Dream Girl @73 : हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असा केला वाढदिवस साजरा, पाहा Photos ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्यावर्षी 16नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात