सलमान खानलाही बसला निसर्ग चक्रीवादळाचा फटका, फार्महाऊसचं झालं नुकसान, पाहा Photos

सलमान खानलाही बसला निसर्ग चक्रीवादळाचा फटका, फार्महाऊसचं झालं नुकसान, पाहा Photos

सलमानच्या फार्महाऊसचे वादळानंतरचे फोटो आता समोर आले आहेत. ज्यात या वादळामुळे फार्महाऊसची काय अवस्था झाली हे पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जून : काही दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानं महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलं. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या वादळामुळे नुकसान झालेलं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी झालं कोसळल्यानं पाणी आणि वीज या सारख्या मुलभूत सुविधांपासून लोकं वंचित आहेत. या वादळाचा सलमान खानला देखील फटका बसला आहे. त्याच्या पनवेल फार्महाऊसचं या वादळामुळे नुकसान झालं. सलमानच्या फार्महाऊसचे वादळानंतरचे फोटो आता समोर आले आहेत. ज्यात या वादळामुळे फार्महाऊसची काय अवस्था झाली हे पाहायला मिळत आहे.

सलमानच्या फार्म हाऊसचे वादळानंतरचे फोटो त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात तिनं वादळ येण्याची आधीचे आणि नंतरचे दोन्ही फोटो पोस्ट केले आहेत. युलियानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये या वादळानं सलमानच्या फार्महाऊसचं कशाप्रकारे नुकसान केलं हे पाहायला मिळत आहे. फार्म हाऊसच्या परिसरात अनेक ठिकाणी मोठी मोठी झाडं वादळामुळे कोसळल्याचं पाहायला मिळत आहे.

युलिया संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सलमानच्या फार्महाऊसवरच वास्तव्यास आहे. याशिवाय या ठिकाणी तिच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस आणि बहीण अर्पिता खान आपल्या पूर्ण कुटुंबासोबत थांबली आहे. सर्वजण मिळून लॉकडाऊनचं व्यवस्थित पालन करत आहेत. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यावर सलमान आपल्या वडिलांना भेटून पुन्हा फार्म हाऊसवर परतला होता.

सलमान बद्दल बोलायचं तर तो सुद्धा बाकी सेलिब्रेटींप्रमाणेच लॉकडाऊनमध्ये आपल्या घरी थांबला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. त्यांना घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करताना दिसत आहे. याशिवाय त्यानं आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनाची सुद्धा काळजी घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याची दोन गाणी आणि म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे.

सनीनं लॉकडाऊनमध्येच सोडली होती मुंबई, आता म्हणते; मला परत यायचंय कारण...

'हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता' करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा

अक्षय ठरला फोर्ब्सच्या यादीत एकमेव भारतीय सेलिब्रेटी, एवढी आहे वर्षभरातली कमाई

First published: June 5, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या