सनीनं लॉकडाऊनमध्येच सोडली होती मुंबई, आता म्हणते; मला परत यायचंय कारण...

सनीनं लॉकडाऊनमध्येच सोडली होती मुंबई, आता म्हणते; मला परत यायचंय कारण...

लॉकडाऊन सुरू असतानाही अभिनेत्री सनी लिओनी आपल्या पती आणि मुलांसह मुंबई सोडून अमेरिकेला रवाना झाली होती.

  • Share this:

मुंबई, 5 जून : सध्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी देशभरात लॉकाडऊन करण्यात आलं आहे. मात्र तरीही या व्हायरसचं संक्रमण कमी झालेलं नाही अशात लॉकडाऊन सुरू असतानाही अभिनेत्री सनी लिओनी आपल्या पती आणि मुलांसह मुंबई सोडून अमेरिकेला रवाना झाली होती. पण आता तिला पुन्हा मुंबईची आठवण येत आहे. तिचं म्हणणं आहे की शक्य असतं तर मी आत्ताच पहिली फ्लाइट पकडून मुंबईला परत आले असते.

सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. लॉकाडऊनमध्ये ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. पण सध्या अमेरिकेत असलेल्या सनीला आता मुंबईची आठवण सतावत आहे. टाइम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार मागच्या महिन्यात सनी लॉकडाऊनमध्येच अमेरिकेला रवाना झाली होती. पण आता तिला पहिल्याच फ्लाइटनं मुंबईला येण्याची इच्छा आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली, 'सध्याच्या परिस्थितीत आमचं डॅनिअलचं त्याची आई आणि कुटुंबासोबत असणं खूप गरजेचं होतं आणि मलाही माझ्या कुटुंबासोबत राहायचं होतं.'

 

View this post on Instagram

 

Went to the farm today with @dirrty99 we are now picking our own veggies straight from Mother Earth! :) great day!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी म्हणाली, 'मी पर्सनली मुंबई सोडायच्या निर्णयामुळे दुःखी होते. मला मुंबई अजिबात सोडायची नव्हती. त्यामुळे युएसला जाण्याचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला एवढा वेळ लागला. त्यामुळे आता आम्ही भारतात तेव्हाच परत येऊ शकतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू होईल. खरं तर मला लगेचच फ्लाइट पकडून मुंबईला यावं असं वाटतंय पण आता याला पर्याय नाही.'

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीनं लॉकडाऊनमध्येच उरकलं लग्न, पाहा PHOTOS

त्याने माझा विश्वासघात केला... LIVE VIDEO शूट करत अभिनेत्रीची आत्महत्या

First published: June 5, 2020, 12:58 PM IST

ताज्या बातम्या