'हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता' करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा

'हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता' करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा

संजय कपूरनं हनीमूनच्या रात्रीच माझा सौदा केला होता असा धक्कादायक आरोप करिश्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जून : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या सिनेमापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच सक्रिय असते. करिश्मा लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर झाली मात्र त्यापूर्वी तिनं अनेक रोमँटिक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले होते. मात्र तिच्या रियल लाइफ लव्ह स्टोरीचं मात्र हॅप्पी एंडिंग होऊ शकलं नाही. जेव्हा 'हां मैंने भी प्यार किया' या सिनेमानंतर तिचा साखरपुडा अभिषेक बच्चनसोबत झाला होता त्यावेळी करिश्मा खूप खूश होती. बच्चन कुटुंबानं भव्य कार्यक्रमात करिश्माचं आपल्या कुटुंबात स्वागत केलं होतं. मात्र काही दिवसांनंतर त्यांचं नातं तुटलं आणि अभिषेक-करिश्माचे रस्ते वेगवेगळे झाले.

अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्यावर लगेचच करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरशी ठरवण्यात आला. 2003 मध्ये या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. मात्र लग्नाच्या अवघ्या 7 वर्षांतच या दोघांचा घटस्फोट झाला. 2010 ला करिश्मा आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून आली. संजय आणि करिश्मा यांच्या घटस्फोटाची केस सुद्धा बराच काळ चालली. दरम्यानच्या काळात दोघांनीही एकमेकांवर बरेच गंभीर आरोप केले. करिश्मानं संजयच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या तसेच तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलखातीत तिनं संजय कपूर बाबत धक्कादायक खुलासा केला.

View this post on Instagram

#family❤️

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करिश्माच्या घटस्फोटाची केस सुरू असताना संजयनं तिच्यावर केवळ पैशाच्या हव्यासापोटी लग्न केल्याचा आरोप केला होता मात्र आता करिश्मानं त्याच्यावर हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता असा आरोप लावला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करिश्मा म्हणाली, त्यानं हनीमूनच्या रात्रीच माझा सौदा केला. त्यानं मला त्याच्या मित्रांसोब एक रात्र घालवण्यास सांगितलं होतं आणि जेव्हा मी असं करण्यास नकार दिला त्यावेळी त्यानं मला मारहाण केली.

करिश्मा पुढे म्हणाली, संजय आणि त्याच्या कुटुंबानं मात्र मानसिक आणि शारिरीक छळ सुद्धा केला. त्याची आई सुद्धा मला अगदी लहान-लहान कारणांवरून मारहाण करत असे. माझा अपमान करत असे. एवढंच नाही तर संजयनं त्याच्या भावाला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं.

View this post on Instagram

#love❤️

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती नुकतीच एकता कपूरच्या मेंटलहुड या वेब सीरिजमध्ये दिसली होती. बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिलेल्या करिश्मानं या वेबसीरिजमधून कमबॅक केलं आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुक सुद्धा झालं. या वेबसीरिजची कथा मातृत्वावर बेतली आहे. जी हे सांगण्याचा प्रयत्न करते की कशाप्रकारे एक आई तिच्या मुलांना सांभाळण्यासोबतच घर-ऑफिस आणि इतर बाहेरच्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडते.

First published: June 5, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या