जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कुशल पंजाबी आत्महत्या : ‘तू माझा मुलगा...’, मित्राचा हात पकडून ढसाढसा रडली आई

कुशल पंजाबी आत्महत्या : ‘तू माझा मुलगा...’, मित्राचा हात पकडून ढसाढसा रडली आई

कुशल पंजाबी आत्महत्या : ‘तू माझा मुलगा...’, मित्राचा हात पकडून ढसाढसा रडली आई

कुशल पंजाबीच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची अवस्था कशी आहे याबद्दल त्याच्या मित्रानं माहिती दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला. 37 वर्षीय या अभिनेत्यानं नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. कुशलच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यानं आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं म्हटलं आहे. पण कुशलचे नातेवाईक मात्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. त्याच्या निधनाची बातमी पहिल्यांदा त्याचा मित्र करणवीर बोहरा याच्या पोस्टमधून समजली होती. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या आत्महत्येबद्दल वेगवेगळे खुलासेही केले. पण आता त्याचा आणखी एक मित्र कुशल टंडन यानं त्याच्या आईच्या सध्याच्या अवस्थेबद्दल माहिती दिली आहे. कुशलच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची अवस्था काय आहे याबद्दल कुशल टंडननं सांगितलं. कुशल टंडन पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, मी त्याचा फार जवळचा मित्र नाही. पण त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस अगोदरच मी त्याला एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो. जेव्हा मी त्याच्या आत्महत्येबद्दल ऐकलं तेव्हा मी खूप हैराण झालो. त्यानं निराशेमुळे एवढं टोकाचं पाऊल का उचलावं हे मला अजूनही समजत नाही आहे. त्यानं असं करायला नको होतं. कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर Ex गर्लफ्रेंड म्हणते… कुशल टंडन पुढे म्हणाला, मी त्याची आई आणि बहीण यांनाही भेटलो. त्याचा आई-वडीलांना यावर अद्याप विश्वास बसत नाही आहे. ते मनानं खूप खचले आहेत. मला आठवतं मी जेव्हा त्याच्या आईला भेटलो त्यावेळी त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या , तू सुद्धा कुशल आहेस ना? इथे थांब, माझ्या जवळ बस. काल तो तुझ्यासोबत पार्टीमध्ये होता ना? त्यावेळी तो ठिक होता का? कुशल पंजाबी त्याच्या आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं लिहिली पोस्ट कुशल टंडनला सुद्धा मित्राच्या अशा जाण्याचा धक्का बसला आहे. तो म्हणला, मला माहित आहे की त्याच्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. त्याचं लग्न तुटण्याच्या मार्गावर होतं. पण त्यानं एवढं टोकाचं पाऊल उचलणं खरंच धक्कादायक आहे. डिप्रेशनवर मोकळेपणानं बोलणं गरजेच आहे. कोण कुठल्या परिस्थितीतून जातंय हे कधी-कधी आपल्याला माहित नसतं. फक्त कुशल टंडनच नाही तर कुशल पंजाबीचा जवळचा मित्र करणवीर बोहराला सुद्धा त्याच्या या परिस्थिती बद्दल पूर्णपणे माहित नव्हतं. तणावमुक्त राहायचंय? मग फॉलो करा इम्रान हाश्मीचा सोपा डाएट प्लान

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात