मुंबई, 30 मार्च: अभिनेता सलमान खान सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे त्याला जीवे मारण्याची धमकी मिळालेली असताना दुसरीकडे त्याच्यासमोर अजून एक मोठी अडचण वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. पत्रकारासोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी अभिनेता सलमान खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. आपल्या बॉडीगार्डसोबत अभिनेत्याने एका पत्रकारावर हल्ला करून त्याला धमकावल्याचा आरोप सलमान खानवर आहे. त्याप्रकरणी सलमानला दिलासा मिळाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
ही घटना एप्रिल 2019 ची आहे जेव्हा बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकावर पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. सलमान खान सायकलिंगसाठी बाहेर जात असताना एका पत्रकार त्याचे चित्रीकरण करत असताना हा प्रकार घडला. सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 2019 मध्ये अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने पत्रकाराच्या तक्रारीवरून सलमान खानला समन्स पाठवले होते. यावर सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सलमानला दिलासा देत समन्सला स्थगिती दिली होती.
पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आरआर खान यांच्या न्यायालयात आयपीसी कलम ३२३ (दुखापत करणे), ३९२ (दरोडा) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत 'तक्रार' दाखल केली होती. आता हे समन्स हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सलमानला दिलासा मिळाला आहे.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
तक्रारीनुसार, कथित घटना 24 एप्रिल 2019 रोजी सकाळी घडली जेव्हा सलमान खान सायकलवरून जात होता आणि त्याच्यासोबत त्याचे दोन अंगरक्षक होते. पांडेने सांगितले की, तो कारमधून जात होता आणि अभिनेत्याला पाहून त्याने त्याच्या अंगरक्षकाच्या संमतीने सलमानचे चित्रीकरण सुरू केले. मात्र, अभिनेता संतापला आणि त्याच्या अंगरक्षकांनी त्याच्या गाडीकडे धाव घेतली आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
सलमान खानने आपल्याला मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. पोलिसांनी त्याची तक्रार लिहून न दिल्यामुळे त्याला कोर्टात जावे लागले. आता हे समन्स हायकोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सलमानला दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan