मुंबई, 31 मार्च: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचे कोर्ट-कचेरीशी जुनं नातं आहे. आता सलमान खान अतिक्रमणाच्या केसमध्ये अडकत चालला आहे. हे प्रकरण आहे सलमान खान आणि त्याचे एनआरआय शेजारी केतन कक्कर (Salman Khan NRI neighbour Ketan Kakkar) यांच्यामधील. सलमान खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतीमा मलिन केल्याचा आरोप करत मानहानीची केस दाखल केली होती. ज्यामध्ये कोर्टाने अभिनेत्याची अंतरिम याचिका (Salman Khan interim plea rejected) फेटाळली आणि शेजारी केतन कक्कर यांच्याकडे सलमानविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट केले आहे. सलमान खानचे शेजारी केतन कक्कर एक एनआरआय आहेत आणि सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसच्या अगदी बाजूला ते राहतात. त्यांनी यूट्यूब चॅनेलवरुन सलमान खानवर निशाणा साधला होता. ज्यानंतर अभिनेत्याने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. हे वाचा- PHOTO: कतरिना कैफ-विकी कौशलचं रोमँटिक व्हेकेशन, एकमेकांमध्ये हरवलेले दिसले लव्ह बर्डस केतन यांच्याकडे सर्व पुरावे असल्याचं न्यायालयाचं स्पष्टीकरण आता मुंबईतील न्यायालयाने केतन कक्कर यांच्याकडे असलेले पुरावे योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. कोर्टाने सांगितल्यानंतर सलमानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सलमान खानच्या वकिलाचा असा आहे दावा या प्रकरणात सलमान खानच्या वकिलाचा असे म्हणणे आहे की, केतन कक्कर यांनी सलमान खानच्या फॉर्महाऊसच्या बाजूला जमीन घेण्याचा प्रयत्न केला होता. जमिनीचा हा व्यवहार वारंवार रद्द होत राहिला कारण हा व्यवहार बेकायदेशीर होता. या प्रकरणानंतर केतन कक्कर यांनी सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. हे वाचा- 1996 साली केतन कक्कर यांनी खरेदी केली होती जमीन तर दुसरीकडे केतनच्या वकिलांचे असे म्हणणे आहे की, केतने 1996 साली ही जमिन खरेदी केली होती, ज्याठिकाणी ते निवृत्तीनंतर राहणार होते. मात्र 7-8 वर्षात सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी केतनची जमिन हडपली होती.