मुंबई, 21 मार्च : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला coronavirus आता जगभरातील इतर देशांसोबतच भारतातहीवेगानं पसरत आहे. आतापर्यंत देशभरात या व्हायरसचे 271 रुग्ण आढळून आले आहे. ज्यातील 63 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवलं आहे. सध्या सर्वजण त्यांच्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. मात्र सलमान खान मात्र शांत बसलेला नाही. घरी असलेला वेळ सुद्धा तो काही ना काही काम करुन घालवताना दिसत आहेत. नुकताच सलमानचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो त्याच्या घरच्या बागेत काम करत असताना दिसत आहे. सध्या सलमान खान सुद्धा होम क्वारंटाईन आहे आणि तो हा पूर्ण वेळ त्याची फॅमिली आणि त्याचे छंद जोपासताना दिसत आहे. सलमानची बहीण अर्पिता खाननं सलमानचा एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात सलमान खान त्याचा भाचा अहिलसोबत बागेत फिरताना आणि फळं तोडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान कुठल्या स्टार प्रमाणे नाही तर सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या फॅमिलीला वेळ देताना दिसत आहे. इतकंच नाही त्याचे कपडे सुद्धा सामान्य व्यक्तींप्रमाणेच आहेत. Coronavirus Outbreak दरम्यान सोनाक्षी करतेय पार्टी? Video पाहून नेटिझन्स भडकले
या व्हिडीओमध्ये सलमान त्याचा भाचा अहिलसोबत प्रेमानं गप्पा मारताना दिसत आहे. हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सर्वजण सलमानच्या या अंदाजावर फिदा झाले आहेत. सलमान खान त्याच्या भाच्यावर किती प्रे करतो हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आता मिळालेला मोकळा वेळही सलमान त्याच्या लाडक्या भाच्यासोबत घालवताना दिसत आहे. …म्हणून आमिर खाननं राणी मुखर्जीची फोनवरुन मागितली माफी काही दिवसापूर्वी सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो मोकळ्या वेळेत पेंटिंग करताना दिसला होता. त्यानं ड्रॉइंग पेपरवर दोन महिलांचं एक सुंदर स्केच तयार केलं होतं. त्याचा हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. होता. सलमानचा सेल्फ आयसोलेशनचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडलेला दिसत आहे. सलमानच्या या व्हिडीओंचं खूप कौतुक होताना दिसत आहे. फ्रेंड्ससोबत आलिया करत होती TikTok Video, पण झाली ‘गलती से बिग मिस्टेक’