मुंबई 24 जून: अभिनेता, समिक्षक कमाल आर. खान उर्फ केआरके (KRK) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. देशभरात घडणाऱ्या राजकीय घडामोडिंपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत विविध विषयांवर तो आपली मतं व्यक्त करतो. यामुळं अनेकदा तो गोत्यात देखील आला आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला. त्यानं ‘राधे’ (Radhe) चित्रपटाचा रिव्ह्यू करत असताना सलमान खानवर (Salman Khan) यथेच्च टीका केली होती. त्याच्या खासगी आयुष्यावर देखील त्यानं भाष्य केलं होतं. या प्रकरणी सलमाननं कोर्टाचा दरवाजा ठोठावला. परिणामी आता केआरकेला सलमान विरुद्ध कुठलीही टीकाटीप्पणी करता येणार नाही. मुंबईतील दिवाणी कोर्टाने केआरकेला सलमानवर कमेंट्स आणि पोस्ट करण्यापासून तात्पुरते रोखले आहे.
‘अभिनेत्यानं लग्नाचं आमिष दाखवून फसवलं’; मिनिषा लांबाचा गौप्यस्फोट
सलमान खानने केआरके विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायाधीश सी. व्ही मराठे म्हणाले, “प्रतिष्ठा आणि सन्मान हा चांगल्या व्यक्तीसाठी सुरक्षा आणि स्वातंत्र्या समान आहे.” कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार केआरके आता सलमान खान, त्याचं कुटुंब आणि त्याच्या कंपनी विरोधात बोलू शकत नाही. सलमानचे वकील प्रदीप गांधी म्हणाले, “केआरकेच्या सगळ्या पोस्ट अपमानास्पद होत्या. चित्रपटावर कमेंट करण्यावर कोणतीही बंदी नाही पण वैयक्तिक आरोप चुकीचे आहेत.”
खणाची साडी, नथीचा नखरा; पाहा दिप्ती देवीचे वटपौर्णिमेनिमित्त खास फोटो
प्रकरण काय आहे?
सलमान खाननं एकूण 9 जणांविरोधात मानहानिचा दावा ठोकला होता. या 9 जणांमध्ये केआरकेचा देखील सामावेश आहे. ही मंडळी सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्यावर वारंवार टीका करत होते. त्यांची ही वक्तव्य रोखली जावी यासाठी सलमाननं कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. हे प्रकरण केआरकेनं राधे चित्रपटावर केलेल्या रिव्ह्यूमुळं आणखी पेटलं. कोर्टाच्या निकालावर केआरकेनं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Movie review, Salman khan