एका बॉलिवूड अभिनेत्यानं लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचे आरोप तिनं केले.
|
1/ 6
मिनिषा लांबा ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळापासून मिनिषा सिनेसृष्टीत कार्यरत नाही. परंतु तरी देखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांद्वारे ती सतत चर्चेत राहू लागली आहे.
2/ 6
अलिकडेच RJ सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत मिनिषानं एक गौप्यस्फोट केला. एका बॉलिवूड अभिनेत्यानं लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचे आरोप तिनं केले.
3/ 6
ती म्हणाली तिचं व्यक्तीमत्व खुपच खुल्या विचारांचं आहे. कोणाशीही तिची चटकन मैत्री होते. अन् तिच्या याच स्वभावाचा गैरवापर एका बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला होता.
4/ 6
या मुलाखतीत तिनं त्या अभिनेत्याचं नाव सांगितलं नाही. पण ती बराच काळ त्याला डेट करत होती. त्यानं लग्नाचं वचनही तिला दिलं होतं. परंतु काही काळानंतर त्यानं ब्रेकअप केलं.
5/ 6
मिनिषाला आता फिल्मि दुनियेत काम करण्याऱ्या कुठल्याच व्यक्तीवर विश्वास राहिलेला नाही. ती यापुढे सिनेसृष्टीतील कोणालाही डेट करणार नाही. एकदा विश्वास घात झाला की पुन्हा विश्वास ठेवायला भीती वाटते असं ती म्हणाली.
6/ 6
मिनिशानं काही वर्षांपूर्वी रायन थामसोबत लग्न केलं होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. सध्या ती दिल्लीमधील एक व्यवसायिकाला डेट करत असल्याची चर्चा आहे.