खणाची साडी, नथीचा नखरा; पाहा दिप्ती देवीचे वटपौर्णिमेनिमित्त खास फोटो
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो.
|
1/ 10
‘वटपौर्णिमा’ म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत.
2/ 10
हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे.
3/ 10
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो.
4/ 10
या पार्श्वभूमीवर आज 24 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जात आहे.
5/ 10
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित अभिनेत्री देखील मोठ्या उत्साहानं आजचा दिवस साजरा करत आहेत.
6/ 10
‘अवघाची हा संसार’ या सुपरहिट मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिप्ती श्रीकांत देवी ही देखील मोठ्या उत्साहानं वटपौर्णिमेचा सण साजरा करत आहे.
7/ 10
तिनं वटपौर्णिमेच्या निमित्तानं खास खणाची साडी देखील नेसली होती.
8/ 10
हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
9/ 10
या फोटोंमधील तिचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
10/ 10
काहींनी तर तू अगदी नक्षत्रासारखी दिसतेस अशा प्रतिक्रिया या फोटोंवर दिल्या आहेत.