मुंबई, 17 ऑक्टोबर : बॉलिवूडची(Bollywood Dream Girl ) 'ड्रीमगर्ल'म्हणून अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांना ओळखलं जातं. बॉलिवूडमधील ही यशस्वी अभिनेत्री सध्या राजकारणात आपली धमक दाखवून देत आहे. त्यांनी प्रत्येक भूमिका अगदी उत्कृष्टरित्या साकारली आहे. शोलेमधील 'बसंती' असो किंवा सीता और गीतामध्ये दुहेरी भूमिका असो या अभिनेत्रीने प्रत्येक भूमिका अजरामर केली आहे. हेमा मालिनी यांनी 16 ऑक्टोबरला त्यांचा 73 वाढदिवस साजरा केला. त्यांनी नुकतेच त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे (hema malini 73 birthday celebrations )काही खास फोटो शेअर केले आहेत.
हेमा मालिनी यांनी त्यांच्या ट्वीटर अंकाऊटवर त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर करत म्हटले आहे की, माझ्या कुटुंबासोबत व काही खास मित्रांसोबत मी वाढदिवस साजरा केला. या फोटोत धर्मेंद्र व हेमा मालिनी दोघेही लाल रंगाच्या कपड्यात खूपच सुंदर दिसत आहेत. यासोबतच मुलगी ईशा देखील दिसत आहे. यो फोटोत दोघेही मुलगी ईशाला केके भरवताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील काही मित्रंडळी म्हणजे रमेश शिप्पी देखील दिसत आहेत. हेमा मालिनी यांच्यावर कालपासून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Birthday celebrations at home with family and few close friends pic.twitter.com/Lp4peEMZB5
— Hema Malini (@dreamgirlhema) October 17, 2021
उत्तम नृत्यांगणा, अभिनेत्री, निर्माती आणि आता राजकारणातील सक्रिय नेत्या असलेल्या हेमा मालिनी यांनी वयाच्या 15व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हेमा मालिनी यांनी यश चोप्रा, रमेश सिप्पी, रामानंद सागर यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले असून, आजही त्या 'ड्रीम गर्ल' म्हणूनच ओळखल्या जातात. हेमा मालिनी यांना 2000 साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वाचा : सुष्मिता सेनला गिफ्ट म्हणून कोणीच देऊ शकत नाही 'डायमंड', बॉयफ्रेंड देखील नाही ; हे आहे कारण..
दरम्यान, 70-80चा काळ गाजवणाऱ्या हेमा मालिनी या आजही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचं दिसून येतं. ‘जॉनी मेरा नाम’, ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘सीता और गीता’, ‘ड्रीम गर्ल’, ‘शोले’ आणि ‘बागबान’ या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. हेमा मालिनी यांनी 2004 साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्या आजपर्यंत राजकारणात सक्रिय नेत्या म्हणून कार्यरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Dharmendra deol