मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Salman Khan च्या फॅन्सनी ओलांडली मर्यादा, Antim पाहिल्यानंतर सिनेमागृहात केला विचित्र प्रकार; Video शेअर करत सलमान म्हणाला...

Salman Khan च्या फॅन्सनी ओलांडली मर्यादा, Antim पाहिल्यानंतर सिनेमागृहात केला विचित्र प्रकार; Video शेअर करत सलमान म्हणाला...

एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके (Salman Khan Fans burns firecrackers at movie theater) फोडले आहेत.

एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके (Salman Khan Fans burns firecrackers at movie theater) फोडले आहेत.

एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके (Salman Khan Fans burns firecrackers at movie theater) फोडले आहेत.

मुंबई, 28 नोव्हेंबर: अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'अंतिम' (Salman Khan Antim Movie) अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे दंबग खानचे चाहते विशेष उत्सुक आहेत. पण या चाहत्यांनी इतरांच्या उत्साहाला गालबोट लागेल असा प्रकार केल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे स्वत: सलमान खान देखील भडकला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अशाप्रकारे न वागण्याचं आवाहन अभिनेत्याने व्हिडीओद्वारे केले आहे. सलमान खानचा 'अंतिम- द फाइनल ट्रुथ' सिनेमाघरात प्रदर्शित झाल्यानंतर चाहते उत्साहत आहेत. अनेक चाहते थिएटर्समध्येच जाऊन सिनेमा पाहत आहेत. या दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके (Salman Khan Fans burns firecrackers at movie theater) फोडले आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कृत्य करणाऱ्या चाहत्यांना आवाहन केले आहे. इन्स्टाग्रामवरून व्हायरल होत असलेला व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, थिएटरमध्ये फटाके फोडण्यासारख्या गोष्टी करणे टाळा, कारण त्याचा परिणाम खूप धोकादायक असू शकतो.

सलमानने ही पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की ऑडिटोरियमच्या आतमध्ये फटाके फोडू नका, ते खूप धोकादायक ठरू शकते. तुमचे आणि इतरांचे आयुष्य यामुळे धोक्यात येऊ शकते. माझी थिएटर मालकांना विनंती आहे की त्यांनी सिनेमाघराती फटाके घेऊन जाण्यास परवानगी देऊ नये आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना असे करण्यास कोणत्याही परिस्थितीत थांबवावे. चित्रपट एन्जॉय करा पण या गोष्टी टाळा.'

हे वाचा-जाह्नवी कपूरला मेकअप आर्टिस्टसोबत भांडणताना पाहून अर्जुन कपूर म्हणाला...

अंतिम- द फायनल ट्रूथ या सिनेमात सलमान खानसह आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

First published:
top videos

    Tags: Salman khan