जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जाह्नवी कपूरचे मेकअप आर्टिस्टसोबत जोराचे भांडण; अर्जुन कपूरची अशी होती प्रतिक्रिया

जाह्नवी कपूरचे मेकअप आर्टिस्टसोबत जोराचे भांडण; अर्जुन कपूरची अशी होती प्रतिक्रिया

जाह्नवी कपूरचे मेकअप आर्टिस्टसोबत जोराचे भांडण; अर्जुन कपूरची अशी होती प्रतिक्रिया

नुकताच जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत जोरदार वाद घालताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 नोव्हेंबर : बोनी कपूर (Boney Kapoor) आणि दिवंगत श्रीदेवी (Sridevi) यांची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत जोरदार वाद घालताना दिसत आहे. दोघी भांडत आहेत असे दिसते आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्सही यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. जान्हवीच्या पोस्टवर अर्जुन कपूरची कमेंट आता तुम्ही विचार करत असाल की जान्हवी कपूर तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत खरोखरच भांडत आहे. असे अजिबात नाही. वास्तविक, या व्हिडिओमध्ये खोटे शाब्दिक भांडण झाले आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवीने ‘बिग बॉस 5’ स्पर्धक पूजा मिश्रा आणि सोनाली नागराणी यांच्या भांडणाची कॉपी केली आहे.इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना, “तुम्हाला काय वाटते मला मदत हवी आहे” असे कॅप्शन लिहिले आहे. जान्हवी कपूरचा भाऊ अर्जुन कपूरने या पोस्टवर लिहिले, ‘होय.’ यासोबतच त्याने एक सायलेंट इमोजीही पोस्ट केला आहे. वाचा : Bigg Boss 15: तेजस्वीच्या बोलण्यावर सलमान भडकला; एका क्षणात केली बोलती बंद, पाहा VIDEO जान्हवीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. या व्हिडिओमध्ये जान्हवीने पूजाची कॉपी केली आहे. यासोबतच तिला मेकअप आर्टिस्टनेही खूप पाठिंबा दिला. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

जाहिरात

‘मिली’ चित्रपटाचे शूटिंग केले पूर्ण दरम्यान, जान्हवी कपूरच्या आगामी ‘मिली’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूर यांच्या प्रोडक्शनमध्ये काम करत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टावर एक फोटोही शेअर केला असून याची माहिती दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. वाचा : VIDEO : उर्वशी रौतेलाने सोलमेटबद्दल खुलासा करताच चाहत्यांना झाली ‘या’ क्रिकेटरची आठवण विशेष म्हणजे जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट ‘धडक’ होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिची आई श्रीदेवी यांचे अकाली निधन झाले. अभिनेत्री तिच्या आईच्या खूप जवळ होती. जान्हवीने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे. ‘मिली’ व्यतिरिक्त जान्हवी कपूर ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या बॅनरखाली बनत आहे. यासोबतच जान्हवी कपूर ‘गुल लक जेरी’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात