मुंबई, 28 जुलै- 'बिग बॉस' हा टीव्हीवर सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक सीजनपासून बॉलिवूड भाईजान सलमान खान हा शो होस्ट करत आहे. या शोचे तब्बल 15 सीजन पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांना आता शोच्या पुढच्या सीजनची प्रतीक्षा आहे. निर्माते आता शोच्या 16 व्या सीजनची तयारी करत आहेत. शोच्या प्रत्येक सीजनमध्ये नवनवीन थीम पाहायला मिळतात. यादरम्यान बिग बॉसच्या संपूर्ण घराला त्या थीमनुसार डेकोरेट केलं जातं. गेल्या वर्षी जंगल थीम ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये कोणती थीम असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो 'बिग बॉस 16'च्या थीमचे असल्याचं सांगितलं जात आहे.
'बिग बॉस'मध्ये अनेक सेलिब्रेटी स्पर्धक सहभागी होतात. मालिका,चित्रपट किंवा इतर शोमध्ये पाहिलेले आपले आवडते कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत? हे पाहण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. आणि बिग बॉसच्या 100 दिवसांत प्रेक्षकांना त्याबाबत अंदाज येतो. शोच्या प्रत्येक सीजनला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. बिग बॉस 15 ने निरोप घेतल्यापासून लोक सीजन 16 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉसच्या घरात सेलेब्रेटींमध्ये घडणारे राडे,धम्माल, मैत्री,प्रेम अशा अनेक रंजक गोष्टी पाहण्याची त्यांना उत्सुकता लागून आहे.
तत्पूर्वी एका इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या घराच्या आतील भागाची झलक शेअर केली आहे आणि सांगितले आहे की 'बिग बॉस सीझन 16' ऍक्वा थीमवर असेल. हा फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 'बिग बॉस'चे घर निळ्या रंगाच्या लाईट्सने सुंदर सजवण्यात आल्याचं व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये काही तथ्य आहे की नाही याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. परंतु हे फोटो पाहून चाहते मात्र उत्सुक झाले आहेत.
(हे वाचा: तुम्ही पाहिली का करिश्मा कपूरची सवत?आता बनणार 'या' अभिनेत्याची बायको)
मीडिया रिपोर्टनुसार, यंदाही सलमान खान हा शो होस्ट करेल. तसेच निर्माते स्पर्धकांसोबत चर्चा करण्यात व्यग्र आहेत. टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, टीना दत्ता, सुरभी ज्योती, लॉकअप विजेता मुनव्वर फारुकी, पूनम पांडे यांच्याशी निर्मात्यांनी संपर्क साधल्याच्या बातम्या आल्या आहेत, परंतु अद्याप कोणत्याही स्पर्धकाबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan