• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ही ‘Choti Kangana’ आहे तरी कोण? Photo पाहून बॉलिवूडची क्वीनही चक्रावली

ही ‘Choti Kangana’ आहे तरी कोण? Photo पाहून बॉलिवूडची क्वीनही चक्रावली

छोटी कंगना म्हणून प्रसिद्ध झालेल्या या मुलीचे फोटो पाहून स्वत: कंगना देखील अवाक झाली आहे.

 • Share this:
  मुंबई 10 जुलै: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सिनेसृष्टीतील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक प्रतिक्रिया देते. यामुळे अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी कंगना एका चिमुकल्या फॅनमुळे चर्चेत आहे. ही लहान मुलगी अगदी हुबेहुब कंगनासारखेच फोटो सोशल मीडियावर शेअर करते. छोटी कंगना म्हणून प्रसिद्ध झालेल्या या मुलीचे फोटो पाहून स्वत: कंगना देखील अवाक झाली आहे. अ‍ॅक्टिंग के लिए कुछ भी! बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी Pearl V Puri पळाला होता घरातून या लहान मुलीनं छोटी कंगना नावाचं एक इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केलं आहे. यावर ती कंगना रणौतची नक्कल करताना दिसते. अनेकदा तिच्यासारखा पेहरावर करुन फोटोशूट देखील करते. परिणामी सोशल मीडियावर ती छोटी कंगना म्हणून प्रसिद्ध झाली आहे. या लहान मुलीची किर्ती आता खुद्द कंगनापर्यंत देखील पोहोचली आहे. स्वत: कंगनानं तिचे फोटो शेअर तिचं कौतुक केलं आहे. शिवाय “तू अभ्यास करतेस का? की दिवसभर तुचं हेच सर्व सुरु असतं.” अशी कमेंट करत तिची फिरकी देखील घेतली आहे. संस्कारी बाबुजींवर झाले बलात्काराचे आरोप; #MeToo मुळे आलोक नाथ बेरोजगार
  या मुलीनं आपलं खरं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. परंतु तिला कंगनासारखीच एक लोकप्रिय अभिनेत्री व्हायचं आहे अशी इच्छा तिने एका लाईव्ह व्हिडीओ सेशनमध्ये व्यक्त केली होती.
  Published by:Mandar Gurav
  First published: