प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या जबरदस्त अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रियांकानं हॉलिवूड सिनेसृष्टीतही स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच प्रियांका आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देखील आपलं नशीब आजमावून पाहात आहे. तिनं न्यूयॉर्कमध्ये स्वत:चं एक 7 स्टार रेस्तरॉ सुरु केलं आहे प्रियांकाच्या या रेस्तरॉचं नाव सोना असं आहे. यामध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या रेस्तरॉमध्ये नुकतेच प्रियांकानं एक बोल्ड फोटोशूट केलं. हे फोटो सध्या सोशल मीडिय़ावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. काही चाहत्यांनी तर तिच्या या नव्या लुकची तुलना हॉलिवूड सुपरस्टार किम कार्दशियन हिच्याशी देखील केली आहे.