जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tiger 3 : सलमान खान दिवाळीला देणार खास सरप्राईज, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Tiger 3 : सलमान खान दिवाळीला देणार खास सरप्राईज, पोस्ट शेअर करत म्हणाला...

टायगर 3

टायगर 3

गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘टायगर 3’ चित्रपटाची चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑक्टोबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘टायगर 3’ चित्रपटाची चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतंच सलमाननं याविषयी एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. टायगर 3 बद्दल सलमान खानने मोठी घोषणा केली आहे. सलमानची ही घोषणा त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या मोठ्या ट्रीटपेक्षा कमी नाही. ‘टायगर 3’ ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांना आता या चित्रपटाच्या रिलीजसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सलमान खानने या चित्रपटाची नवीन रिलीज डेट शेअर केली आहे. सलमान खानने टायगर 3 चा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच चित्रपटाच्या  नव्या रिलीज डेटची घोषणा केलीये. पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर  ‘टायगर 3’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट यापूर्वी 21 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार होता. मात्र आता दिवाळीला सलमान खान चाहत्यांना मोठं गिफ्ट देणार आहे.

जाहिरात

पोस्ट शेअर करत भाईजानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टायगरची नवीन तारीख आहे… दिवाळी 2023 आहे! फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर #YRF50 सह #Tiger3 साजरा करा. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, मनीष शर्मा सलमान खानच्या ‘टायगर 3’चे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी, दानिश हुसैन आणि कुमुद मिश्रा सारखे कलाकार दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात