मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'सैराट'मधील लंगड्या त्याच्या आर्चीसाठी घातलोय 'गस्त'; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'सैराट'मधील लंगड्या त्याच्या आर्चीसाठी घातलोय 'गस्त'; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

सैराट सिनेमातील (Sairat movie) आर्ची आणि परश्याला रसिक प्रेक्षकांनी (audience) डोक्यावर घेतलं होतं. त्याबरोबरच लंगड्याचा अभिनय लोकांना भावला होता.

सैराट सिनेमातील (Sairat movie) आर्ची आणि परश्याला रसिक प्रेक्षकांनी (audience) डोक्यावर घेतलं होतं. त्याबरोबरच लंगड्याचा अभिनय लोकांना भावला होता.

सैराट सिनेमातील (Sairat movie) आर्ची आणि परश्याला रसिक प्रेक्षकांनी (audience) डोक्यावर घेतलं होतं. त्याबरोबरच लंगड्याचा अभिनय लोकांना भावला होता.

मुंबई, 14 फेब्रुवारी : सैराट सिनेमातील (Sairat movie) आर्ची आणि परश्याला रसिक प्रेक्षकांनी (audience) डोक्यावर घेतलं. मात्र या सिनेमातील सहायक व्यक्तिरेखाही चाहत्यांच्या मनावर कोरल्या गेल्या. त्यातलीच एक व्यक्तिरेखा परश्याचा मित्र लंगड्याची.

लंगड्याचं वास्तव आयुष्यातलं नाव आहे तानाजी गालगुंडे (Tanaji galgunde). हा तानाजी पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेसाठी (new role) सज्ज झाला आहे. झी टॉकीजच्या 'गस्त' सिनेमातून (Gast marathi movie) तानाजी प्रमुख भूमिका करणार आहे. तानाजीही या भूमिकेबाबत खूप उत्सुक आहे.

आपल्या या नव्या भूमिकेबाबत बोलताना तानाजी म्हणाला, 'मी 'गस्त' या सिनेमात एक खास भूमिका साकारत आहे. या भूमिकेचं नाव अमर आहे. हा अमर एका मुलीच्या प्रेमात असतो. तो राहत असलेल्या गावात पाहारा देताना तो त्या मुलीची भेट घेत असतो.

हेही वाचासिद्धार्थ-मितालीचे Unseen PHOTO आले समोर; पुण्याजवळ वाड्यात असं झालं लग्न

या दोघांची हळवी प्रेमकथा (love story) पुढं काय वळण घेते हे पहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतो आहे. मी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना (audience) नक्कीच आवडेल याची खात्री आहे.' सध्या सोशल मीडियावर या भूमिकेची आतापासूनच मोठी चर्चा रंगली आहे.

तुलनेनं ग्लॅमर नसलेला तानाजीचा चेहरा प्रेक्षकांना खूप आवडला. त्याचा सहजसुंदर अभिनय अनेकांची मनं जिंकून गेला. त्याचे मोजकेच संवाद आणि अभिनय रसिकांना खूप आवडला. तानाजीला नव्या रूपात आणि मुख्य भूमिकेत बघायला अनेकजण उत्सुक आहेत. या चित्रपटात अनेक इतरही तगड्या कलाकारांची फौज रसिकांना पहायला मिळेल.

First published:
top videos

    Tags: Actor, Marathi entertainment, Sairat