या दोघांनीही मंगळवारी (Mercedes-Benz G-Class) ची टेस्ट ड्राइव्ह घेतली. यादरम्यान सैफ गाडी चालवताना दिसला तर करिना बाजूच्या सीटवर बसली होती. यावेळचा दोघांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर सैफ करिनासाठी ही गाडी विकत घेणार आहे. Mercedes-Benz G-Class या कारची किंमत तब्बल 2.5 कोटी इतकी आहे.View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच या जोडप्यानं मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतलं आणि तिथे शिफ्ट केलं. यानंतर आता सैफ Mercedes-Benz G-Class ही कार करिनाला गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. करिनाच्या बाळाचा चेहरा पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच मुलासोबतच एक फोटोही पोस्ट केला होता. मात्र, यातही मुलाचा चेहरा दिसत नव्हता. 21 फेब्रुवारीला सैफनं स्वतः दुसऱ्या मुलाच्या जन्माची बातमी दिली होती. अद्याप या कपलनं आपल्या बाळाच्या नावाबद्दलही माहिती दिलेली नाही.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kareena Kapoor, Kareena kapoor baby, Saif Ali Khan, Star celebraties, Super expensive