मुंबई, 28 ऑक्टोबर- बॉलिवूड मध्ये सध्या स्टार्सपेक्षा स्टारकिड्सची हवा सुरु आहे.हे स्टार किड्स सतत चर्चेत असतात. बरेच स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये एन्ट्री न घेताही सोशल मीडियावर अफाट लोकप्रिय आहेत. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान हा बॉलिवूडचा सर्वाधिक चर्चेत असलेला स्टार किड आहे. इतक्या लहान वयात तैमूर एखाद्या मोठ्या अभिनेत्या इतका लोकप्रिय आहे. जन्मापासूनच तैमूर अली खान मीडियाचं लक्ष वेधून घेत आहे.तैमूर आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. सध्या तैमूर अली खान प्रमाणेच त्याचा धाकटा भाऊ जेह देखील खूप चर्चेत आहे.अभिनेता सैफ अली खानने आपल्या मुलांना मिळणाऱ्या लाइमलाइटबद्दल खुलेपणाने सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, तैमूरच्या लाइमलाइटमुळे त्याच्या कुटुंबाची कशी गोची होते. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत सैफ अली खानने कबुल केलं की, तैमूरकडे मीडियाचं प्रचंड खूप लक्ष जातं. तसेच सैफ अली खानने सांगितलं की, यामुळे तैमूरकडे शाळेतही विशेष लक्ष दिलं जातं. जे सैफ अली खानला अजिबात आवडत नाही. स्टार मुलांना शाळेत इतकं महत्त्व दिलं नसतं तर बरं झालं असतं असं तो म्हणतो. तो फक्त एक लहान मुलगा आहे आणि माझी इच्छा आहे की, त्याने बाकीच्या मुलांमध्ये मुक्तपणे मिसळावं. परंतु सध्या ते होत नाहीय. **(हे वाचा:** अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये का झाली हाणामारी? VIRAL VIDEO पाहून सर्वांनाच धक्का ) मुलाखतीमध्ये सैफ अली खान पुढे म्हणतो की, तैमूरला तो कोणाचा मुलगा आहे याबद्दल आत्तापासूनच खूप उत्सुकता आहे आणि त्याला त्याच्या स्टारडमची जाणीव आहे. पण त्याच्यामध्ये ती आवड स्वतःहून आलेली नाहीय. मला आणि करीनाला हे चांगलंच माहीत आहे. आम्ही त्याला सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं हे शिकवलं आहे. तैमूर सतत पापाराझींच्या कॅमेरात कैद होतो. त्याच्या प्रत्येक हालचालींवर मीडियाचं लक्ष असतं. घराच्या बाहेर खेळतांना, शाळेत जाताना, एयरपोर्टवर तैमूरला प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्यात कैद केलं जातं. सैफ अली खान मुलाखतीदरम्यान म्हणतो की, तैमूरकडे मीडियाच्या इतक्या अटेन्शनमुळे कधीकधी आपल्या कुटुंबाची प्रचंड चिडचिड होते. तो पुढे सांगतो की म्हणूनच या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी तो आपल्या कुटुंबासह विदेशात सुट्टीसाठी जातो. कारण तिथे तैमूरला मुक्तपणे वावरायला वाव मिळतो. काही वेळा कॅमेरा पाहून तैमूर उद्धट वागतो त्यामुळे करीना आणि सैफला ट्रोलदेखील केलं गेलं आहे.
नुकतंच करीना कपूर खान आपला धाकटा मुलगा जेहसोबत मुंबई एयरपोर्टवर दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, करीना हंसल मेहताच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाली आहे. हंसल मेहताच्या या चित्रपटात करीना मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तैमूरच्या शाळेतील तायक्वांदो स्पर्धेतील फोटो शेअर केले होते. ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.