मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये का झाली हाणामारी? VIRAL VIDEO पाहून सर्वांनाच धक्का

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये का झाली हाणामारी? VIRAL VIDEO पाहून सर्वांनाच धक्का

रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार

रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार

दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यात सेटवर बाचाबाची झाली होती.त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 28 ऑक्टोबर-   बॉलिवूड खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'सूर्यवंशी' गेल्या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं. या चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. 'सूर्यवंशी'चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं होतं. या चित्रपटात प्रेक्षकांना तुफान ऍक्शन पाहायला मिळाली होती.या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. परंतु तुम्हाला माहितेय का की, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऑनस्क्रीन ऍक्शनसोबतच ऑफस्क्रीन ऍक्शनही पाहायला पाहायला मिळालं होतं. चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यात सेटवर बाचाबाची झाली होती.

सध्या सोशल मीडियावर एखादी गोष्ट क्षणार्धात व्हायरल होत असते. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होताना दिसून येतात. बऱ्याचवेळा कलाकारांचे फॅन पेज काही थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करतात आणि ते व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत असतात. असंच काहीसं अक्षय कुमारसोबतसुद्धा झालं आहे. अक्षय कुमारने शेअर केलेला एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी एकमेकांना मारमारी करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला, अक्षयची सहकलाकार कतरिना कैफ तिच्या फोनवरुन एक बातमी वाचताना दिसत आहे आणि तिने तिचा फोन ठेवताच अक्षय आणि रोहित शेट्टी यांच्यात भांडण झाल्याचं पाहायला मिळतं.

(हे वाचा: धक्कादायक! प्रसिद्ध निर्मात्याने पत्नीला कारने चिरडलं; परस्त्रीसोबत पकडल्याने केला कांड, CCTV फुटेज VIRAL)

काही महिन्यांपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ ट्विट करत खिलाडी अक्षय कुमारने लिहलं होतं की, 'एक संघर्ष जो कदाचित तुमचा दिवस बनवेल.' हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला होता आणि नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर जोरदार कमेंटही केल्या होत्या.आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर हा जुना व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. खरं तर, सूर्यवंशमच्या सेटवर शूटिंगदरम्यान हा व्हिडीओ बनवण्यात आला होता. या चित्रपटाच्या सेटवर रोहित अक्षय आणि कतरिना बरीच मजामस्ती करतांना दिसून येत होते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले होते.

सूर्यवंशी चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टीसह करण जोहरने केली होती. या चित्रपटात 'सिम्बा' आणि 'सिंघम' यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत. तुम्हालाही माहिती असेलच की, 'सिम्बा' आणि 'सिंघम' हे दोन्ही चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केले होते. रणवीर सिंग, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी मोठ्या पडद्यावर एकत्र येऊन धम्माल केली होती. लॉकडाऊननंतर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता.

तुम्हाला सांगू इच्छितो, की 'सूर्यवंशी' हा अक्षय कुमारच्या करिअरमधील 15 वा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अक्षयच्या या यशाबद्दल चाहत्यांनी अक्षयचं मनापासून अभिनंदन केलं होतं. लॉकडाऊननंतर 'सूर्यवंशी' या चित्रपटाने अवघ्या 11 दिवसांत 155.73 कोटींची कमाई केली होती.

First published:
top videos

    Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment, Rohit Shetty