जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'My Iron Lady' प्रिया बापटसाठी सई ताम्हणकरच्या 'वजनदार' शुभेच्छा!

'My Iron Lady' प्रिया बापटसाठी सई ताम्हणकरच्या 'वजनदार' शुभेच्छा!

'My Iron Lady' प्रिया बापटसाठी सई ताम्हणकरच्या 'वजनदार' शुभेच्छा!

सई आणि प्रिया ‘वजनदार’ या चित्रपटात एकत्र झळकल्या होत्या. या चित्रपटातसुद्धा यांची घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर- मराठीतील उत्कृष्ट आणि गुणी अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला**(Priya Bapat Birthday)** ओळखलं जात. हि अभिनेत्री आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरने**(Sai Tamhankar)** प्रिया बापटला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती प्रिया बापटसोबत दिसून येत आहे. सईने फोटो शेअर करत एक खास कॅप्शन दिलं आहे, हॅप्पी बर्थडे माय आयर्न लेडी, लव्ह यू’ असं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या कॅप्शनवरूनच प्रिया आणि सईचं नातं किती घट्ट आहे हे दिसून येत. (**हे वाचा:** मराठी कलाकारांसोबत अंकिता लोखंडेचा ‘पिंगा’;डान्स VIDEO होतोय तुफान VIRAL ) सई आणि प्रिया ‘वजनदार’ या चित्रपटात एकत्र झळकल्या होत्या. या चित्रपटातसुद्धा यांची घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. हि कथा दोन लठ्ठ मुलींच्या आयुष्यावर आधारित होती. त्यांच्या जास्त वजनामुले त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो, किती काही सहन करावं लागतं, आपलं आनंद, आपल्या आवडीचे कपडे या सर्वांमध्ये किती मन मारावं लागतं हे यामध्ये दाखवलं आहे. तसेच कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा वापर न करता योग्य पद्धतीने वजन कमी करता येऊ शकत हेसुद्धा यामध्ये दाखवण्यात आलं होत. यामध्ये सई आणि प्रिया खूपच गोड अशा मैत्रिणी दिसून आल्या होत्या. (**हे वाचा:** Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; PHOTO ) प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ मध्ये झाला होता. प्रियाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटातुन आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यांनतर ती ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या संजय दत्तच्या सुपरहिट चित्रपटातहि झळकली होती. प्रिया मालिका, नाटक आणि चित्रपट तिन्ही क्षेत्रात उत्तम काम करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात