मुंबई, 18 सप्टेंबर- अभिनेत्री अंकिता लोखंडे**(Ankita Lokhande)** नुकताच मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी अंकिताने मराठी कलाकारांसोबत स्टेजवर ‘पिंगा’ सुद्धा घातला आहे. हे सर्व पाहून चाहते फारच खुश झाले आहेत. गणेशोत्सवानिमित्त ठेवण्यात आलेल्या ‘नव्या नात्यांचा श्री गणेशा**’(Navya Natyancha Shri Ganesha)** या कार्यक्रमामध्ये अंकिताने हजेरी लावली होती. गणेशोत्सव आनंदाचा, उत्साहाचा आणि आपल्या लोकांसोबत नाती अधिक घट्ट करण्याचा सोहळा असतो. गणरायाच्या आगमनाने वातावरण अगदी सकारात्मक बनत. त्यामुळे सर्वांना हा उत्सव हवाहवासा वाटतो. म्हणूनच सर्व कलाकारसुद्धा आपल्या शूटिंगमधून ब्रेक घेत बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले होते.
यावर्षी १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील विघ्न नाहीशी करण्यासाठी विघ्नहर्ता अगदी थाटामाटात विराजमान झाला आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन झालं आहे. मात्र मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन अनंत चतुर्थीला केलं जाणार आहे. सर्व लोक बाप्पाच्या भक्तीत व्यग्र आहेत. अनेक लोक आपल्या मित्रपरिवारसोबत हा उत्सव साजरा करत आहेत. (**हे वाचा:** Bigg Boss Marathi:पहिल्यांदाच बिग बॉसच्या घराची संपूर्ण झलक आली समोर; PHOTO ) नुकताच झी मराठीवर गणेशोत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘नव्या नात्यांचा श्री गणेशा’ असं या कार्यक्रमाचं नाव होतं. यामध्ये सर्व मराठमोळ्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. मात्र एका व्यक्तीने सर्वांचं खास लक्ष वेधून घेतलं होतं. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून सर्वांची लाडकी अर्चना अर्थातच अंकिता लोखंडे होय. नुकताच ‘पवित्र रिश्ता २’ मालिकेला सुरुवात झाली आहे. ही प्रचंड लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा आपल्या भेटीला आल्याने चाहते भारावून गेले आहेत. याच मालिकेच्या निमित्ताने अंकिताने या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. (हे वाचा: Sidharth Shukla Duplicate: हुबेहूब सिद्धार्थ शुक्लासारखा दिसणारा तरुण होतोय …. ) गुलाबी रंगाच्या सिम्पल साडीमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत होती. अंकितासोबत भाऊ कदम, स्नेहल शिदम, निर्मिती सावंत यासह इतर कलाकारांनी मोठी धम्माल केलेली पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी अंकिताने सर्व कलाकारांना ‘पिंगा’वर नृत्य करण्यास भागसुद्धा पाडलं. सर्वच कलाकारांनी अंकिताला अतिशय सुंदर साथ देत या नृत्याने कार्यक्रमात चार चाँद लावले आहेत. येत्या १९ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता हा एपिसोड आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. (हे वाचा: नियती आणणार अंतरा-मल्हारला एकत्र? ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट ) अंकिता नुकताच पवित्र रिश्ता २ मधून आपल्या भेटीला आली आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा झळकत आहे. मात्र सर्व चाहते मानव अर्थातच सुशांत सिंह रजपूतला मोठ्या प्रमणात मिस करत आहेत. दुसऱ्या भागामध्ये सुशांतच्या जागी मानव या भूमिकेत अभिनेता शाहीर शेख दिसून येत आहे.