जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोण आहे Sai Tamhankar चा 'साहेब दौलतराव'? Mystery Man चा फोटो शेअर करत म्हणाली...

कोण आहे Sai Tamhankar चा 'साहेब दौलतराव'? Mystery Man चा फोटो शेअर करत म्हणाली...

कोण आहे Sai Tamhankar चा 'साहेब दौलतराव'? Mystery Man चा फोटो शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील ती व्यक्ती कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विशेष बाब म्हणजे सईने हा फोटो शेअर करताना दिलेलं कॅप्शन आणि वापरलेले हॅशटॅग रंजक आहेत. तर ही व्यक्ती कोण आहे, असा सवाल चाहत्यांना पडला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 एप्रिल: बॉलिवूड असो वा मराठी सिनेसृष्टी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar Latest Photo) हिने नेहमीच तिचा ठसा उमटवला आहे. बॉलिवूडकरांनी अलीकडेच तिचं Mimi मधील कामाचं कौतुक केलं आहे. यासाठी तिला सहाय्यक अभिनेत्रीच्या कामासठी ‘आयफा’चं (Sai Tamhankar nominated for performance in supporting role female fo MIMI in IIFA) नामांकनही मिळालं आहे. शिवाय मराठीमध्ये ती बॅक टू बॅक हिट देत आहे. सई ताम्हणकर तिच्या या सर्व कामांमुळे नेहमीच चर्चेत राहत आली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा सईबाबत चर्चा होत आहे, पण यावळी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील ती व्यक्ती कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विशेष बाब म्हणजे सईने हा फोटो शेअर करताना दिलेलं कॅप्शन आणि वापरलेले हॅशटॅग रंजक आहेत. हे वाचा- रितेश देशमुखचं वजन एवढं वाढलं की शर्टाचं बटणही लागेना, तरीही जेवणावर मारलाय ताव! पाहा VIDEO हा फोटो शेअर करताना सईने असं म्हटलं आहे की, ‘Gosh, मी कशाप्रकारे तुला ब्लश करायला भाग पाडते नं..!’ या काहीशा गोड कॅप्शननंतर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने #one #saheb #daulatrao असे काही हॅशटॅग्ज वापरले आहेत. अर्थात सईने या फोटोतील व्यक्तीसाठी One किंवा साहेब किंवा दौलतराव अशी संबोधनं दिली असावीत.

जाहिरात

सईने हा फोटो पोस्ट केल्यानंतर ‘या फोटोतील व्यक्ती कोण?’, ‘आम्ही नक्की काय समजावे?’, ‘हार्ट इमोजीज’ अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना देखील या व्यक्तीबाबत जाणून घ्यायची इच्छा आहे. सईची जवळची मैत्रिण अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat and Sai Tamhankar), अभिनेता वैभव तत्ववादी, सुयश टिळक, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी देखील हार्ट इमोजी असणाऱ्या कमेंट केल्या आहेत. याशिवाय प्रिया बापटने केलेल्या कमेंटमध्ये या फोटोतील व्यक्तीला टॅग देखील केले आहे. त्यावरुन ही व्यक्ती निर्माता अनिश जोग आहे. अनिश जोग आणि सई ताम्हणकर यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. गर्लफ्रेंड, धुरळा, YZ, टाइम प्लीज इ. अशा काही चित्रपटांचा अनिश निर्माता आहे. सईने याआधी देखील काही सिनेमांच्या निमित्ताने अनिशसह फोटो शेअर केले होते.

अनिश जोगचे इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहता त्याने देखील सईसह एक ट्रेडिशनल अंदाजातील फोटो काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. या फोटोला त्याने ‘मॅजिक, यू अँड मी’, असं कॅप्शन दिलं होतं. त्यावर सईने देखील-‘खरोखर’ अशी कमेंट केली होती. या फोटोवर प्रिया बापटने अशी कमेंट केली होती की, ‘क्या बात हैं फायनली..’, तर सोनाली कुलकर्णीने सईला अनिशची ‘Plus One’ म्हटले होते. शिवाय सईच्या मित्र परिवारातील असलेल्या मृण्मयी गोडबोले, स्पृहा वरद, मिताली मयेकर, श्रेया बुगडे, सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, तेजस्विनी पंडित इ. या सर्व कलाकारांनी हार्ट इमोजी पोस्ट करत या फोटोचं कौतुक केलं होतं. अनिशच्या कॅप्शनवरुन आणि सर्वांच्या कमेंट्सवरुन चाहत्यांनी असा अंदाज बांधला जात आहे की सई आणि अनिश हे मराठी सिनेसृष्टीतील नवं कपल आहे आणि ते दोघं डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात