जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sai Tamhankar: सईचा बर्थडे यावर्षी एकदम दणक्यात; एकीकडे आयफा तर दुसरीकडे दिलं स्वतःला मोठं गिफ्ट!

Sai Tamhankar: सईचा बर्थडे यावर्षी एकदम दणक्यात; एकीकडे आयफा तर दुसरीकडे दिलं स्वतःला मोठं गिफ्ट!

Sai Tamhankar: सईचा बर्थडे यावर्षी एकदम दणक्यात; एकीकडे आयफा तर दुसरीकडे दिलं स्वतःला मोठं गिफ्ट!

सईने (Sai Tamhankar) काल आपला वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा केल्याचं कळत आहे. तिने स्वतःलाच एक भलंमोठं आणि सुंदर गिफ्ट दिल्याचं सुद्धा समजत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 जून: मराठीतील परमसुंदरी म्हणजे अभिनेत्री सई ताम्हाणकरचा (Sai tamhankar birthday) दणक्यात वाढदिवस साजरा झाला. सईला जगभरातून तिच्या मित्रमैत्रीणींनी शुभेच्छा दिल्याचं समोर येत आहे. सई इंडस्ट्रीतील अनेकांची जान आहे त्यामुळे आपल्या लाडक्या मैत्रिणीला शुभेच्छा द्यायला कलाकार विसरले नाहीत. सईसाठी हा वाढदिवस खूप जास्त स्पेशल होता. काय आहे याचं कारण? सांगलीतून सईचा प्रवास सुरु झाला तो आता थेट बॉलिवूडच्या सिल्वर स्क्रीनपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सईला अभिनय क्षेत्रात करिअर करायला सांगली सोडून मुंबईला यावं लागलं. पण आज सईने एवढं घवघवीत यश मिळालं आहे की तिने मुंबईमध्ये स्वतःच घर घेत स्वतःचं स्वतःला (Sai tamhankar new house) खूप मोठं सरप्राईज दिलं आहे. मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर घेण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. आपापल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार प्रत्येकजण घर घ्यायचं स्वप्न कस पूर्ण होईल याकडे भर देताना दिसतो. सईचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याचं समोर येत आहे.

जाहिरात

अर्थात याबद्दल या अभिनेत्रीने स्वतःहून कोणतीच न्यूज शेअर केली नाहीये. पण तिच्या मित्रांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि तिच्या नव्या घराचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. नवं घर स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून घेण्याची मजा सध्या सई अनुभवताना दिसत आहे. तिचा (Sai Tamhankar boyfried) मित्र आणि कथित बॉयफ्रेंड अनिश जोगने सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिच्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता. नुकतंच या नव्या घराचं गणेशपूजन सुद्धा पार पडलं. हे ही वाचा-  ‘स्वतःसोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं…’; प्रिया बापटची नवी पोस्ट चर्चेत सईने आतापर्यंत अनेक भूमिका अगदी लिलीया पेलल्या आहेत. तिच्यासाठी दुप्पट आनंदाची गोष्ट म्हणजे आयफा पुरस्कारने तिचा झालेला सन्मान. तिने अबुदाबीमध्ये खास मराठी अंदाजात प्रेक्षकांचे आभार मानले होते. चाहत्यांच्या लाडक्या सईने एक गोड बातमी दिल्याने तिचं अभिनंदन केलं जात आहे. सई सध्या बेरोजगार या भाडिपा युट्युब चॅनेलच्या नव्या वेबसिरीजमध्ये दिसून आली. या वेबसिरीजच्या आणि भाडिपाच्या संपूर्ण टीमने बेरोजगारच्या यशाची आणि सईच्या वाढदिवसाची एकत्रच पार्टी केल्याचं अनेक व्हिडिओमधून दिसून आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात