मुंबई, 31 ऑगस्ट : अभिनेत्री सई ताम्हणकरने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. तिच्या भूमिकांचे वेळोवेळी कौतुक देखील झाले. तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. पण तिने आता अजून उंच भरारी घेतली आहे. तिला हिंदी चित्रपटसृस्थितीला सर्वात मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता सईला या भूमिकेसाठी सर्वोत्त्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘मिमी’ या चित्रपटात सई ताम्हणकरने काम केलं होतं. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होती. क्रितीने या चित्रपटात एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती. तर मराठमोळ्या सईने क्रितीच्या मैत्रिणीची म्हणजेच ‘शमा’ ही भूमिका साकारली होती. ‘मिमी’ या चित्रपटातील सई ताम्हणकरच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. सईला मिळालेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार हा तिच्या कामाची सर्वात मोठी पोचपावती म्हणावी लागेल. सध्या पुरस्कार मिळाल्याने सई प्रचंड आनंदी आहे. तिच्यावर सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण आता एका खास व्यक्तीने तिचं कौतुक केलं आहे. ही व्यक्ती म्हणजे सईचा बॉयफ्रेंड अनिश जोग. निर्माता असणाऱ्या अनिशला सई डेट करत आहे. त्यांनी एकमेकांविषयी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुनच त्यांच्या रिलेशनशिपचा अंदाज बांधण्यात आला. दरम्यान एवढा मोठा पुरस्कार जिंकल्यानंतर अनिशने सईसाठी खास पोस्ट केली आहे.
अनिशने सईसाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सईचा ट्रॉफीसोबत असणारा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अनिशने असं लिहिलं आहे की, ‘तिने हे यश प्राप्त करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली आहे. तिने दीर्घकाळापासून या यशाचे स्वप्न पाहिली आहे. ती सर्वात उत्तम आहे. ती इथे कायम असणार आहे.’ हेही वाचा - Ganesh Chaturthi 2022 : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा पाहिला का? भव्य देखाव्यांची होतेय चर्चा तसेच तो पुढे म्हणाला की, ‘तिला तिच्या मेहनतीने हे यश तिला मिळालं आहे.’ पुढे त्याने ‘तू अशीच स्वप्न पाहत राहा’ असे म्हंटले आहे. सईबद्दल अनिशने केलेल्या या पोस्टमुळे सध्या चाहते प्रचंड खुश झाले आहेत. त्यांनी अनिशच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांप्रमाणेच अनेक कलाकार देखील सईचं तोंडभरून कौतुक करत आहेत.