जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sai Tamhankar : बॉलिवूडच्या 'सिरीयल किसर' अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी सई; नाव ऐकूण तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sai Tamhankar : बॉलिवूडच्या 'सिरीयल किसर' अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी सई; नाव ऐकूण तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sai Tamhankar

Sai Tamhankar

‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. सई लवकरच एका हिंदी चित्रपटात दिसणार असून एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने  विविध भूमिका साकारत  तिच्या अभिनयाचा ठसा फक्त मराठी मनोरंजनसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही उमटवला आहे.  हंटर या चित्रपटातून सईने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘मिमी’ या चित्रपटात झळकली. टिकणे साकारलेल्या या भूमिकांचे प्रचंड कौतुक झाले. आता पुन्हा सई  बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.  सई लवकरच एका हिंदी चित्रपटात दिसणार असून एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सई बॉलिवूडच्या  नावाजलेल्या अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचं नाव  ‘ग्राउंड झिरो’ असं आहे. या चित्रपटाच्या  शूटिंगला काश्मीरमध्ये सुरुवात झाली आहे. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार असून आता सई  ताम्हणकर त्याची साथ देणार आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर या चित्रपटात हाश्मी हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा आहे.

जाहिरात

इम्रान, सई आणि चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या काश्मीरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहेत. सई आणि इम्रानच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री झोया हुसैनदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सई आणि इम्रान रोमान्स करताना दिसणार आहेत. या फ्रेश जोडीबद्दल बोलताना, ई- टाइम्सच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली की, “सई चित्रपटात इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. दोन्ही स्टार्सची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” या चित्रपटाच्या टीमने नुकतेच श्रीनगरमधून त्यांचे चित्रीकरण संपवले असून आता पहलगाममध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हेही वाचा - The Kapil sharma show : ‘कपिल शर्मा शो’ मध्ये काम केल्यामुळे ‘या’ अभिनेत्याच्या मुलांना वाटायची लाज; अभिनेत्याचा मोठा खुलासा सईच्या  वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर ती लवकरच मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’ मध्ये दिसणार आहे. या  व्यतिरिक्त सई मृणाल कुलकर्णींच्या ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

इम्रानबद्दल सांगायचे तर, ‘ग्राउंड झिरो’ व्यतिरिक्त त्याच्याकडे सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ देखील आहे. हा चित्रपट मनिष शर्मा दिग्दर्शित करत असून पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच तो अक्षय कुमारसोबत ‘सेल्फी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. प्रेक्षक आता इम्रान आणि सईला  एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात