मुंबई, 19 मार्च- बॉलिवूड असो किंवा मराठी मनोरंजनसृष्टी सध्या सगळीकडे लग्नाचं वारं वाहताना दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसून येत आहेत. या यादीत आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम पश्या अर्थातच अभिनेता आकाश नलवडेचाही समावेश झाला आहे. अभिनेत्याने नुकतंच लग्नगाठ बांधत सर्वांना सुखद धक्का दिला आहे. आकाशवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका एकत्र कुटुंबपद्धतीवर अवलंबून आहे. भावंडांच्यात असणारं प्रेम यामध्ये प्रामुख्याने दाखवण्यात आलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील अंजी आणि पशाची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत पशाची भूमिका अभिनेता आकाश नलावडे याने साकारली आहे. आता आकाश नलावडेला त्याच्या खऱ्य़ा आयुष्यातील अंजी भेटली आहे. (हे वाचा:
Satya Manjrekar: महेश मांजरेकरांचा लेक बनला उद्योजक; ‘या’ क्षेत्रात अजमावणार नशीब
) काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याने आपला साखरपुडा उरकला होता. तर सोशल मीडियावर या दोघांची लग्नपत्रिकाही व्हायरल झाली होती. पश्याची लगीनघाई सुरु झाल्याने सर्वच खुश होते. दरम्यान आता आकाश नलवडे लग्नबंधनात अडकल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याने आपल्या रिअल लाईफ अंजीसोबत सात साता जन्माची गाठ बांधली आहे. आकाश नलवडेच्या लग्नाला मनोरंजन सृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. यामध्ये अभिनेत्री पूजा पुरंदरेचासुद्धा समावेश आहे. पूजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या नवदाम्पत्यासोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. यामध्ये पश्या आणि त्याची रिअल अंजी वधूवराच्या रुपात फारच सुंदर दिसत आहेत.नवदाम्पत्य जेजुरी गडावर दर्शनासाठी पोहोचले आहेत.
आकाश नलावडेच्या खऱ्या आयुष्यातील अंजीचं नाव रुचिका धुरी असं आहे. गेल्यावर्षी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आकाश नलावडेने त्याच्या इन्स्टा स्टोरीला साखरपुड्याचे काही सुंदर फोटो व व्हिडिओ शेअर केले होते. या दोघांच्या साखरपुड्याच्या शुभप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती.आकाश नलावडेची होणारी बायको रुचिका धुरीसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. रुचिका नेहमीच आकाशसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.