मराठी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वीच सिने सृष्टीत पदार्पण केलं आहे. सत्या मांजरेकर 'वेडात वीर दौडले सात' या सिनेमात झळकणार आहे. परंतु या चित्रपटाचं पोस्ट समोर येताच सत्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. परंतु महेश मांजरेकर किंवा सत्या मांजरेकरने याबाबत कधीही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाहीय. दरम्यान आता सत्या मांजरेकर नव्या क्षेत्रात पदार्पण करत असल्याची माहिती समोर आली आहे. महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या अभिनया सोबतच बिझनेसमध्ये आपलं नशीब अजमावणार आहे.. सत्या मांजरेकरने नुकतंच हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. त्याने स्वतः इंस्टाग्रामवरुन याबाबतची माहिती दिली आहे. सत्याच्या हॉटेलचं नाव 'सुका सुखी, द मांजरेकर्स किचन' असं आहे. सत्याच्या या नव्या इनिंगसाठी सर्वच तिचं कौतुक करत आहेत.