मुंबई, 16 फेब्रुवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका एकत्र कुटुंबपद्धतीवर अवलंबून आहे. भावंडांच्यात असणारं प्रेम यामध्ये प्रामुख्याने दाखवण्यात आलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील अंजी आणि पशाची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत पशाची भूमिका अभिनेता आकाश नलावडे याने साकारली आहे. आता आकाश नलावडेला त्याच्या खऱ्य़ा आयुष्यातील अंजी भेटली आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याने आपला साखरपुडा उरकला होता. तर आता त्याच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.
आकाश नलावडे सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रीय असतो. मालिकेतील कलाकारांसोबत तो भन्नाट रील्स शेअर करत असतो. त्याला यामध्ये अंजी देखील साथ देत असते.आता अभिनेत्याला खऱ्या आयुष्यातील अंजी मिळाली आहे. नुकतंच आकाश नलावडेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर करत सर्वांनाच खुश केलं आहे. चाहते त्याच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
आकाश नलावडेच्या खऱ्या आयुष्यातील अंजीचं नाव रुचिका धुरी असं आहे. गेल्यावर्षी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आकाश नलावडेने त्याच्या इन्स्टा स्टोरीला साखरपुड्याचे काही सुंदर फोटो व व्हिडिओ शेअर केले होते. या दोघांच्या साखरपुड्याच्या शुभप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती.
View this post on Instagram
आकाश नलावडेची होणारी बायको रुचिका धुरीसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. रुचिका नेहमीच आकाशसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाहीय. परंतु पत्रिका समोर आल्याने त्यांचं लग्न लवकरच असणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या मनोरंजन सृष्टीत लगीनघाई सुरु असल्याचं दिसून येत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला बॉलिवूड स्टार कपल केएल राहुल आणि अथिया शेट्टी, त्यांनतर गेल्या आठवड्यात कियारा आणि सिद्धार्थने लग्नगाठ बांधली. मराठी मनोरंजनसृष्टीतसुद्धा असंच काहीसं आहे, काही दिवसांपूर्वी 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्याने लग्नगाठ बांधली होती. तर आता आकाश नलावडे लग्न बंधनात अडकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.