मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शिल्पा शेट्टी पॉर्न प्रकरणात सामिल? या मॉडेलकडे मागितला होता न्यूड व्हिडीओ

शिल्पा शेट्टी पॉर्न प्रकरणात सामिल? या मॉडेलकडे मागितला होता न्यूड व्हिडीओ

राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात मॉडेलने केले मोठे खुलासे; रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना करणार मदत

राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात मॉडेलने केले मोठे खुलासे; रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना करणार मदत

राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात मॉडेलने केले मोठे खुलासे; रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना करणार मदत

मुंबई 21 जुलै: शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. या प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. राज हॉटशॉट नामक एका ब्रिटीश कंपनीसाठी पॉर्नपटांची निर्मिती करत असल्याची माहिती समोर आहे. (Raj Kundra Pornography case) दरम्यान अशा अश्लील व्हिडीओंसाठी मॉडेल सागरिका शोना सुमन (Sagarika Shona Suman) हिला देखील देखील विचारण्यात आलं होतं. परंतु तिने वेळीच सावध होत त्यांना नकार दिला.

राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस? कमवायचा बक्कळ पैसे

राजला कुंद्राला अटक होताच सागरिका माध्यमांसमोर आली अन् तिने या प्रकरणी मोठे खुलासे केले. राज पॉर्न चित्रपटांची निर्मिती करतो. तिला देखील अशा चित्रपटांची ऑफर मिळाली होती. तिला ऑनलाईन ऑडिशन देण्यास सांगितलं होतं. शिवाय नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओंची देखील मागणी करण्यात आली होती. अर्थात तिने यासाठी नकार दिला त्यावेळी राज कुंद्रा याने सागरिकासोबत फोनवर संभाषण केलं होतं. अत्यंत अश्लील शब्दात तो तिच्याशी बोलत होता. असे खळबळजनक दावे तिने केले आहेत.

‘तर मी देखील तुरुंगात असते’; राज कुंद्रानं या अभिनेत्रीला दिली होती Pornographyची ऑफर

राज विरोधात पुरावे शोधण्यासाठी सागरिका पोलिसांना मदत करण्यास तयार आहे. “मला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलवावं. जर मला हे इतके मोठे रॅकेट आहे याचा अंदाज आला असता तर त्यांचे कॉल आणि व्हिडीओ मी आधीच रेकॉर्ड करून ठेवले असते. पण हरकत नाही वॉट्स अॅपच्या डेटाबेसमध्ये नक्कीच ते सापडतील. या रॅकेटबद्दल शिल्पा शेट्टीला देखील नक्कीच माहित आहे. कारण फोनवर बोलताना ते तिच्याबद्दलही बोलत होते.” असा दावा देखील सागरिकाने केला आहे.

First published:

Tags: Crime, Entertainment, Porn sites, Raj kundra, Shilpa shetty