ग्लोबल स्टार बनलेल्या प्रियांका चोप्राची स्टाइल थोडी हटके आहे. त्यामुळे ती जेव्हा कुठेही जाते तेव्हा तिच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक होताना दिसतं. असंच काहीस घडलं नुकत्याच पार पडलेल्या 'बिलबोर्ड म्यूझिक अवार्ड' सोहळ्यामध्ये घडलं.
प्रियांकानं नुकतीच तिचा पती निक जोनससोबत 'बिलबोर्ड म्यूझिक अवार्ड' सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिनं सुंदर व्हाइट गाऊन परिधान केला होता. ज्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलं. यासोबतच तिच्या ज्वेलरीहीची सगळीकडे चर्चा झाली.
प्रियांकानं या सोहळ्या त्या ड्रेसला साजेशी अतिशय किमती ज्वेलरी परिधान केली होती. ती या लुक खूपच सुंदर दिसत होती. पण तिच्या या ड्रेस आणि ज्वेलरीची किंमत ऐकाल तरीही तुम्हीही तोंडात बोटं घालाल.
प्रियांकानं या सुंदर व्हाइट गाऊनवर डायमंड नेकलेस घातला होता. याशिवाय तिनं टिफन अँड कंपनीचे 5,600 डॉलर किमतीचे डायमंड इयरिंग आणि 12,000 डॉलरचं ब्रेसलेट कॅरी केलं होतं.
पण या सगळ्यामध्ये सर्वात खास होता तो प्रियांकाचा डायमंड नेकलेस. प्रियांकानं यावेळी 11,000 डॉलर टिफनी हार्डवेयर पेंडेंट आणि दोन नेकलेस घातले होते. यात 55,000 डॉलरचा व्हिक्टोरिया ग्रेजुएटेड लाइन नेकलेस आणि 165,000 डॉलरच्या सर्किट डायमंड नेकलेस नेकलेसचा समावेश होता.
मीडिया रिपोर्टनुसार प्रियांकाचा ड्रेस आणि ज्वेलरीचा एकूण किंमत 1.8 करोड एवढी आहे. मात्र अशाप्रकारे महागडा ड्रेस घालण्याची प्रियांकाची ही पहिलीच वेळ नाही. याआधी प्रियांका पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली होती.तिच्या या ड्रेसची किंमत 54 हजार होती.