मुंबई, 13 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. इतक्या वर्षणापासून हि मालिका आजही प्रेक्षकांना आवडते. पण आता या मालिकेतील मधून एक एक कलाकार बाहेर पडत आहे. त्यामुळे निर्मात्यांचं चांगलचं धाबं दणाणलं होतं. मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानीने देखील गेल्या काही वर्षांपूर्वी मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मालिकेतील लोकप्रिय तारक मेहता यांनीही मालिकेतून एक्झिट घेतली होती. तारक मेहता यांची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वीमालिका सोडत असल्याचं जाहीर केल्यानं प्रेक्षकांना आणखी एक मोठा धक्का बसला होता. पण आता लवकरच नवीन तारक मेहतांची मालिकेत एंट्री होणार आहे. त्याचा एका प्रोमो समोर आला आहे. असित कुमार मोदींच्या लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये आता सचिन श्रॉफ हा अभिनेता तारक मेहतांची भूमिका साकारणार आहे. अनेक दिवसांपासून तो या मालिकेत एंट्री करणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता प्रोमो प्रसिद्ध करून निर्मात्यांनी याची पुष्टी केली आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला आहे. कारण अल्पावधीतच हा प्रोमो लाखो लोकांनी पहिला आहे. प्रोमोची सुरुवात गोकुळधाम सोसायटीतील गणेश चतुर्थी उत्सवाने होते. अंजली मेहता तिचा पती तारकच्या अनुपस्थितीमुळे नाराज आहे. मात्र, त्यानंतर तिला गणपतीच्या दरबारात ‘गणपती बाप्पा मोरया’ असा आवाज ऐकू येतो. ही व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी जेव्हा ती वळते तेव्हा ती दुसरी कोणी नसून सचिन श्रॉफ उर्फ तारक मेहता आहे. प्रोमोमध्ये आता त्याचा पूर्ण चेहरा समोर आला आहे. त्यामुळे सचिनने आता शैलेश लोढा यांची जागा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रोमो शेअर केल्यानंतर लगेचच, अनेक चाहत्यांनी पोस्टवर भरभरून कमेंट आणि लाईक करत नवीन ‘मेहता साहब’ चे स्वागत केले आहे. चाहत्यांनी कमेंट करत त्यांची उत्सुकता दर्शवली आहे. त्याचबरोबर एका चाहत्याने तर ‘हा शो कधीच ऑफ-एअर होऊ नये. लोक या नवीन पात्रांशी जुळवून घेतील’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या चाहत्याने आता निर्मात्यांना दयाबेनलाही परत आणण्याची विनंती केली आहे. हेही वाचा - Cast of Brahmastra 2 : ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘हे’ कलाकार; करण जोहरचा मोठा खुलासा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला आहे. कारण अल्पावधीतच हा प्रोमो लाखो लोकांनी पहिला आहे. गेल्या १४ वर्षांपासून शैलेश लोढा हे या मालिकेत काम करत होते. पण मालिकेचे निर्माते यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याचे होते. पण आता या नवीन तारक मेहतांच्या स्वागतासाठी गोकुळधाम सहित प्रेक्षकही सज्ज झाल्याचं दिसत आहे.