नवी दिल्ली, 31 जानेवारी: गेल्या दोन दिवसांपासून बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक (Hrithik Roshan ) रोशन चर्चेत आला आहे. सुझानसोबतच्या घटस्फोटानंतर हृतिक पहिल्यांदाच एका मुलीसोबत हातात हात घालून फिरताना स्पॉट झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, ही मिस्ट्री गर्ल (Mystery Girl ) कोण आहे. ही चर्चा रंगली होती. तर ती दुसरी तिसरी कोणी नसुन म्युझिशियन सबा आझाद (Saba Azad)) असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या मिस्ट्री गर्लने एक वृत्तसंस्थेशी बोलताना हृतिकसोबतच्या रिलेशनवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी, हृतिक रोशन आणि मिस्ट्री गर्ल सबा आझाद हे दोघे एका हॉटेलबाहेर स्पॉट झाले. आणि चर्चेला उधाण आले. तिच आणि हृतिकच नेमकं नात काय असा सवास बॉलीवूड जगतात उपस्थित झाला आहे. दरम्यान, एक वृत्तसंस्थेने सबा आझादसोबत संवाद साधला. सबाला जेव्हा हृतिक रोशनसोबतच्या नात्याबद्दल विचारले गेले तेव्हा तिने कोणतेही उत्तर दिले नाही. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, या प्रकरणाबाबत सबा आझाद हिच्याशी संपर्क साधला असता, तिने प्रश्न ऐकून घेतला पण उत्तर न देता कॉल डिस्कनेक्ट केला. मिळालेल्या माहितीनुसार, सबाची मुलाखत कॉलवरुन घेण्यात आली. यावेळी हृतिकसोबत व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओसंदर्भात सवाल उपस्थित करण्यात आले. तेव्हा, माफ करा, मी सध्या काही कामात व्यस्त आहे. मी तुम्हाला परत कॉल करेन. असे सांगून तिने कॉल कट केला. विशेष म्हणजे, संवादादरम्यान सबाने हृतिकसोबतच्या नात्याबद्दल सांगण्यास नकार दिला नाही. अभिनेता हृतिक रोशनसोबत जी मुलगी होती ती दुसरी कोणी नसून अभिनेत्री आणि म्युझिशियन सबा आझाद असल्याचं म्हटलं जात आहे. सबा आझाद ही एक अभिनेत्री, थियेटर डिरेक्टर आणि म्युझिशियन आहे. तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात काम केले आहे. अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकेमकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.