मुंबई, 24 फेब्रुवारी- मराठी मालिका, चित्रपट, रिऍलिटी शो ते वेबसीरिज अशा प्रत्येक क्षेत्रात प्राजक्ता माळी ने आपला ठसा उमठवला आहे. अभिनेत्रीचं हास्य अनेकांना वेड लावतं. प्राजक्ता माळीच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावाचे लखोर दिवाने आहेत. अभिनेत्रीचा एक खास चाहतावर्ग आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांना नेहमीच तिच्याबाबत नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतं. केवळ चाहतेच नव्हे तर सेलिब्रेटीसुद्धा प्राजक्ता माळीवर फिदा आहेत. दरम्यान ऋतुजा बागवे आणि प्राजक्ता माळीची ती मुलाखत सध्या जोरदार चर्चेत आली आहे. झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’, कलर्स मराठीवरील ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा दमदार मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे होय. ऋतुजाने मालिकाविश्वात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. सध्या अभिनेत्री चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राजक्ताप्रमाणेच ऋतुजाची एक वेगळी ओळख आहे. अभिनेत्रीची चांगली फॅनफॉलोईंग आहे. (हे वाचा: सलमानची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड असती ‘माहेरची साडी’ची मुख्य नायिका; मग कशी झाली अलका कुबलांची एन्ट्री? ) दरम्यान या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्री ‘पटलं तर घ्या’ या ओटीटी शोमध्ये पोहोचल्या होत्या. या शोमध्ये त्यांना विविध हटके प्रश्न विचारण्यात आले होते. या शोमध्ये दोघींचं घट्ट बॉन्डिंग दिसून आलं. दोघीनींही शोमध्ये चांगलीच धम्माल केली. शिवाय या दोघींनी आपल्या नेहमीच्या बोल्ड अंदाजात अनेक बोल्ड प्रश्नांची अगदी बिनधास्तपणे उत्तरे दिली आहेत. जी आता प्रचंड चर्चेत आली आहेत.
या कार्यक्रमात ऋतुजा बागवेला विचारण्यात आलं होतं की, ‘आम्ही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पाहीलंय की, प्राजक्ता माळी तुझी लेडी क्रश आहे? आणि तुला तिच्यासोबत लेस्बियन अर्थातच समलिंगी जोडीदार व्हायला आवडेल. यावर दोन्ही अभिनेत्रींच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. दोघीनींही मजेशीर हावभाव देत वेळ मारुन नेली. यावरून असं काहीही नाहीय हे स्पष्ट झालं. तर ऋतुजाने आपण या यावर्षी लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
सकाळच्या एका मुलाखतीत अभिनेत्री ऋतुजा बागवेने प्राजक्ता माळी आपली लेडी क्रश असल्याचं उघड केलं होतं. त्यामुळे अनेकांना याबाबत जाणून घेण्याची इच्छा होती.म्हणूनच अभिनेत्रीला हा प्रश्न विचारण्यात आला होता. ऋतुजा आणि प्राजक्ता एकदम चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या सतत एकेमकांना सपोर्ट करताना आणि प्रोत्साहन देताना दिसून येतात.