'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून परीच्या रुपात बालकलाकार मायरा वैकुळ घराघरात पोहोचली आहे. मायराचा मोठा चाहतावर्ग आहे. मायाराला नव्या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान मायराने एक गुड न्यूज देत चाहत्यांना खुश केलं आहे. मायरा मालिकेत परततेय असं वाटत असेल, तर असं सध्या तरी नाहीय. ही गुड न्यूज म्हणजे चिमुकल्या मायराने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. 'ज्वेल्स ऑफ मायरा' असं या ब्रँडचं नाव आहे. प्राजक्तानंतर मायरानेही या क्षेत्रात पाऊल ठेवत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मायरा वैकुळ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या चिमुकलीची आई तिचं सोशल मीडिया अकाउंट हॅन्डल करते. दरम्यान मायाराला या नव्या व्यवसायासाठी चाहते शुभेच्छा देत तिचं कौतुक करत आहेत.