मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्कृष्ट चित्रपट तयार झाले आहेत, त्यातील काही आजही तितकेच लोकप्रिय आहेत. असाच एक सिनेमा म्हणजे अलका कुबल यांचा 'माहेरची साडी' होय. या चित्रपटाने तब्बल ११८ आठवडे लोकांना चित्रपटगृहांमध्ये खेचण्यात यश मिळवलं होतं . या चित्रपटामुळे अलका कुबल रातोरात स्टार बनल्या होत्या. त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली होती. परंतु फारच कमी लोकांनां माहिती असेल, की या सिनेमासाठी निर्मात्यांची पहिली पसंत अलका कुबल नव्हत्या. जाणून आश्चर्य वाटेल कि, माहेरची साडीसाठी मेकर्सना भाग्यश्री पटवर्धन हव्या होत्या. त्यांनी 'मैने प्यार किया' या चित्रपटातून लोकांनां अक्षरशः वेड लावलं होतं. परंतु एन. एस वैद्य आणि पितांबर काळेंसारख्या दिग्गजांच्या आग्रहाखातर अलका कुबल यांना घेण्यात आलं होतं. परंतु रिलीज नंतर अलका कुबल यांच्या अभिनयाने सिनेमा सुपरडुपर हिट ठरला.