Home /News /entertainment /

रशिया अंतराळात करणार सिनेमाचं शूटिंग, अभिनेत्रीसाठी आहेत या अटी

रशिया अंतराळात करणार सिनेमाचं शूटिंग, अभिनेत्रीसाठी आहेत या अटी

रशियातील सर्वांत मोठं चॅनल मानल्या जाणाऱ्या चॅनल वनने अंतराळात चित्रीकरण करण्यात येणारा पहिलावहिला चित्रपट काढत असल्याची घोषणा केली आहे. पण या चित्रपटात असणाऱ्या अभिनेत्रीसाठी चॅनलने काही निकष आणि अटी ठेवल्या आहेत.

  मॉस्को, 9 नोव्हेंबर : अमेरिका (USA) आणि नासा (NASA) अंतराळात (Space) चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी खासगी क्षेत्राला संधी देत आहेत. अमेरिकी अभिनेता टॉम क्रूझला (Tom Cruise) अंतराळात शूटिंग करण्यासाठी परवानगीही मिळाली आहे. आता रशियादेखील (Russia) अंतराळात शूटिंग करण्याच्या तयारीत आहे. टॉम क्रूझला स्पर्धक म्हणून आता रशिया मैदानात उतरत आहे. रशियातील सर्वांत मोठं चॅनल मानल्या जाणाऱ्या चॅनल वनने अंतराळात चित्रीकरण करण्यात येणारा पहिलावहिला चित्रपट काढत असल्याची घोषणा केली आहे. चॅनलने या प्रोजेक्टवर काम करायलाही सुरूवात केली आहे. चित्रपटासाठी आपल्या गरजांनुसार मापदंडही ठरवले आहेत. अंतराळात जाऊन करावं लागणार शूटिंग - रशियाच्या या चॅनलने चित्रपट काढण्याची घोषणा केली. पण या चित्रपटात असणाऱ्या अभिनेत्रीसाठी चॅनलने काही निकष आणि अटी ठेवल्या आहेत, हे विशेष आहे. एखाद्या सामान्य चित्रपटासाठीची ही बाब असती तर तितकंस काही वेगळं नव्हतं, पण चित्रपटासाठी अंतराळात जाऊन शूटिंग करावं लागणार म्हटल्यावर अभिनेत्रीची योग्यताही तशीच असावी लागणार आहे. Space, Russia, tom cruise, Film shooting, Heroine
  (photo : @Space_Station)
  अभिनेत्रीसाठीची पात्रता - चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी योग्य ठरेल अशा व्यक्तिरेखेबाबत पात्रता ठरवण्यात येत आहेत. चॅनल आणि या चित्रपटासाठी करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसकडून हे काम अगदी बारीकसारीक तपशीलांसह सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एक वेबसाइट काढण्यात आली आहे. त्यावर पात्रतेच्या निकषांची सविस्तर माहिती देण्यात आलीय. अंतराळातील घडामोडी टिपण्यासोबतच कॉस्मोनॉटचं प्रोफेशन लोकप्रिय करणं हा या चित्रपटामागील उद्देश आहे. रशियात अतंराळवीरांना कॉस्मोनॉट म्हणतात. (वाचा - BREAKING :अर्जुन रामपालच्या घरावर NCB चा छापा, ड्रायव्हरला घेतले ताब्यात) हे आहेत पात्रतेचे निकष - वेबसाइटनुसार, चित्रपटासाठी निवडण्यात येणाऱ्या अभिनेत्रीचं वय 25 ते 45 वर्षे असावं. तिची उंची 150 ते 180 सेंमीच्या दरम्यान असावी. वजन 50 ते 75 किलोग्रॅम एवढं हवं. याशिवाय छाती 112 सेमी असणं आवश्यक आहे. या भूमिकेसाठी अर्ज करणारा उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी केवळ रशियन उमेदवारच अर्ज करू शकेल. शूटिंग केव्हा होणार? या चित्रपटाचं नाव सध्या तरी ‘चॅलेंज’असं ठेवण्यात आलंय. त्याची निर्मिती रोसकोसमोस, चॅनल वन औ येलो, ब्लॅक अँड व्हाइट स्टुडिओ हे एकत्रितपणे करणार आहेत. इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर पुढच्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये चित्रपटाचं शूटिंग होणार आहे. वैद्यकीय तपासण्यांनंतर निवडण्यात येणाऱ्या दोन महिलांना तीन महिन्यांचं खास ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यातील एक अभिनेत्री आणि दुसरी तिची सहकलाकार असेल. टॉम क्रूझ करत आहे नासासोबत काम - टॉम क्रूझ अंतराळात चित्रपटाचं शूटिंग करणार असल्याच्या बातमीला नासानं यंदाच्या मे महिन्यातच दुजोरा दिला होता. या चित्रपटावर नासा टॉम क्रूझखेरीज इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीसोबत काम करणार आहे. पृथ्वीच्या बाहेर इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर बनवला जाणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे. डोम लीमेन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाबाबत अद्याप इतर काही तपशील सांगण्यात आलेला नाही.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Nasa, Russia, Space, Tom cruise

  पुढील बातम्या