टीव्ही कपल सिद्धांत कर्णिक आणि मेघा गुप्ता यांच्या वैवाहिक जीवनात सध्या बरेच वाद असल्याचं बोललं जात होतं. 2016 मध्ये या दोघांनीही लग्न केलं होतं. पण आता लग्नाच्या अवघ्या 4 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
2/ 6
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धांत म्हणाला, हे नातं वाचवण्यासाठी आम्ही आमच्याकडून जे शक्य होते ते सर्व प्रयत्न केले. मात्र नात्यात जी मानसिक शांतता हवी असते ती आम्हाला मिळू शकली नाही.
3/ 6
सिद्धांत पुढे म्हणाला, आमचं नातं वाचावं म्हणून आम्ही थेरपीसाठी सुद्धा गेलो मात्र त्यातूनही काही खासं असं घडलं नाही अखेर आम्ही दोघं एकमेकांच्या संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
4/ 6
2016 मध्ये या फेमस टीव्ही कपलनं कोर्ट मॅरेज केलं होतं. कार्तिक सोबत मेघाचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिनं 'शादी फेम'चा मालक आदित्य श्रॉफ सोबत लग्न केलं होतं पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. याशिवाय मेघानं टीव्ही अभिनेता नमन शॉला डेट केलं आहे.
5/ 6
मेघा गुप्ता टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध कलाकार आहे. मेघानं काव्यांजली, कुमकुम, सीआयडी, मैं तेरी परछाई हूं, ड्रीम गर्ल आणि यहा मै घर घर खेली या मालिकांमध्ये काम केलं आहे.
6/ 6
सिद्धांत कर्णिकनं एक था राजा एक थी राणी या मालिकेत शेवटचं काम केलं यानंतर तो टीव्ही पासून दूर आहे. त्याआधी त्यानं वे रिमिक्स, माही वे, रिश्ता डॉट कॉम, प्यार की ये एक कहानी, गुस्ताख दिल आणि ये है आशिकी या मालिकांमध्ये काम केलं आहे.